rbi note policy: rbi जास्तीच्या नोटा का नाही बनवत?

rbi note policy अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो – सरकार आपल्यासाठी भरपूर पैसे का नाही छापत? जर गरज आहे तर नोटा का नाही तयार केल्या जात?

RBI म्हणजे काय आणि ती नोट कशी छापते?

RBI (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ही एक कायदेशीर संस्था (Statutory Body) आहे, भारतीय संविधानात उल्लेख नाही, पण 1934 च्या RBI अधिनियमाद्वारे स्थापन झाली आहे.RBI ₹2 आणि त्याहून अधिक मूल्याचे नोट्स छापते ₹1 चे नोट आणि सर्व नाणी (सिक्के) हे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अधिकारात येतात.

का नाही छापत अमर्याद नोटा?

rbi note policy समजा देशात 100 किलो बटाटे आहेत आणि आपण 100 कोटी रुपयांच्या नोटा छापल्या, तर त्या नोटांनी तुम्हाला मिळणार काय? – फक्त तेच 100 किलो बटाटे!
म्हणजेच, माल मर्यादित आणि नोटा अमर्याद, तर त्याचा अर्थ महागाई (Inflation) प्रचंड वाढेल. उदाहरणे: झिम्बाब्वे, व्हेनेझुएला – जेथे लोक बोऱ्याने पैसे घेऊन जातात पण ब्रेड घ्यायला पुरत नाही.

कशाच्या आधारावर RBI नोटा छापते?

RBI “Minimum Reserve System” वापरते – म्हणजेच: कमीतकमी ₹200 कोटींचं मूल्य गोल्ड आणि परकीय चलनात (Forex) राखून ठेवलं जातं. त्याशिवाय, देशात उत्पन्न होणाऱ्या वस्तू आणि सेवा ही खरी शक्ती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर, युरो, पौंड, येन, युआन या चलनांचा स्टॉक आणि गोल्ड रिजर्व यावर देशाची आर्थिक ताकद अवलंबून असते.

चलनाची ‘जागतिक स्वीकार्यता’ का महत्त्वाची?

rbi note policy तुमचं चलन तेंव्हाच मजबूत मानलं जातं जेव्हा इतर देश ते चलन स्वीकारतात.म्हणूनच RBI च्या नोटांवर गवर्नर साइन करून “वचन देतो” म्हणतो. पण ते वचन तेव्हाच खरे जेव्हा त्यामागे खरा माल किंवा चलन साठा असेल.

rbi note policy निष्कर्ष

“नोट छापणं म्हणजे खेळ नाही, ती जबाबदारी आहे.”
जेव्हा देशाकडे गोल्ड, डॉलर, उत्पादन क्षमता आणि वस्तूंचा साठा आहे, तेव्हाच त्या देशाचं चलन मजबूत राहू शकतं.म्हणूनच RBI विचारपूर्वक, नियमन ठेवून आणि आर्थिक शिस्त पाळूनच नोटा छापते.

Leave a Comment