Rain Alert : भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या राज्यात हवामान झपाट्याने बदल होत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 7 दिवस पाऊसच पाऊस होणार आहे. हवामान खात्याने (IMD)अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे आपल्याला वेळेत सावध होण्याची गरज आहे. Rain Alert

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय
कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे aआणि ते 23 मे संध्याकाळपर्यंत म्हणजेच आज अधिक तीव्र होऊन अवदाबात रूपांतरित होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याचा परिणाम म्हणून कोकण (मुंबई, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर), मध्य महाराष्ट्र (पुणे, सातारा, सोलापूर), मराठवाडा (बीड, परभणी, नांदेड), तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत आधिक पावसाची शक्यता वाढली आहे. Rain Alert
हे वाचा : मराठवाड्यात अवकाळी संकट; शेतकाऱ्यांनो कोणती खबरदारी घ्याल ?
कोणत्या जिल्ह्यांना जास्त धोका?
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार खालील दिलेल्या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- रेड अलर्ट (अतिमुसळधार पाऊस): विशेषतः कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
- ऑरेंज अलर्ट (जोरदार पाऊस): मुंबई ,पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.
- यलो अलर्ट (मध्यम पाऊस): इतर भागांत येलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा
या अलर्टचा (Rain Alertअर्थ) असा की काही ठिकाणी नदी-नाले , झाडे पडतील, वीजपुरवठा बंद पडू शकतो आणि रस्तेही बंद होण्याची शक्यता आहे. Rain Alert
शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?
हवामानाचा असा इशारा असताना शेतकरी बांधवांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत:
1. पिकांचे संरक्षण करा
पावसाचा जोर जास्त असल्याने उभ्या पिकांचे नुकसान होऊ शकते. म्हणून:
- ऊस, भात, मका, सोयाबीन यासारख्या पिकांचे पाणी साचू नये यासाठी निचऱ्याची व्यवस्था करा.
- जास्त झाडं असलेल्या शेतात आधाराची सोय करा.
- औषध फवारणीसाठी पावसाच्या वेळापत्रकाचा अंदाज घ्या.
2. यंत्रसामग्री सुरक्षित ठेवा
- ट्रॅक्टर, पंपसेट, जनरेटर व इतर यंत्रसामग्री उघड्यावर ठेवू नका.
- शक्य असल्यास सुरक्षित जागेत हलवा.
3. गुरांच्या गोठ्यांची काळजी घ्या
- पाऊस झेलू शकेल अशा प्रकारे गोठ्याची संरचना करा.
- गाई, म्हशी यांना कोरडं व स्वच्छ ठिकाणी ठेवा.
4. बी-बियाणे आणि खते सुरक्षित ठेवा
- कोरड्या ठिकाणी साठवण करा.
- प्लास्टिक किंवा पाणबंद ड्रममध्ये ठेवा.
मच्छीमार बांधवांसाठी सूचना
अरबी समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे:
- मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात न जाणं हेच सुरक्षित.
- शासनाने दिलेल्या इशाऱ्यांचे काटेकोर पालन करा.
सर्वसामान्य नागरिकांसाठी सूचना
- नदी, ओढे, डोह, धबधब्याजवळ जाणं टाळा.
- विजेच्या तारा, खांब यांना हात लावू नका.
- रात्रीच्या वेळी वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.
- हवामान खात्याच्या अपडेट्स तपासत राहा.
हवामान खात्याचे संकेत आणि सल्ला
भारतीय हवामान खात्याने (IMD) सांगितले आहे की, हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकत असून त्याची तीव्रता वाढू शकते. अशा वेळी पूर येण्याचा धोका वाढतो. विशेषतः कोकण भागात अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. Rain Alert
शेवटी एक विनंती
शेतकऱ्यांनो, निसर्गावर आपलं नियंत्रण नसतं. पण त्याचा सामना करण्यासाठी आपण तयार राहू शकतो. हवामान खात्याचे अपडेट्स, शासकीय इशारे आणि कृषी विभागाच्या सूचना यावर नेहमी लक्ष ठेवा. पावसाच्या पाण्याचा उपयोग योग्य प्रकारे करा, शेतात नुकसान होणार नाही यासाठी वेळेत तयारी करा. Rain Alert
जर तुम्हाला हवामानाशी संबंधित आणखी माहिती हवी असेल, तर आमच्या वेबसाईटवर नियमित भेट द्या.