घरकुल सर्वे साठी मुदतवाढ! या तारखे पर्यन्त करता येणार सर्वे. pradhan mantri awas yojana

pradhan mantri awas yojana ; देशातील गरजू, गरीब आणि बेघर नागरिकांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजना राबवली आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना पक्कं घर देण्याचा उद्देश आहे. या योजनेसाठी घरकुल सर्वेक्षणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

पूर्वी या सर्वेसाठी 30 एप्रिल 2025 ही अंतिम तारीख होती, नंतर ती वाढवून 15 मे 2025 केली गेली. मात्र, नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सरकारने पुन्हा एकदा मुदत वाढवून आता 31 मे 2025 ही अंतिम तारीख जाहीर केली आहे.

मुदतवाढ का करण्यात आली? pradhan mantri awas yojana

pradhan mantri awas yojana घरकुल सर्वेसाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

  • काही जणांकडे जॉब कार्ड नव्हतं,
  • तर काहींना कागदपत्रं तयार करण्यासाठी वेळ लागत होता,
  • मोबाईल अ‍ॅप्स वापरणं कठीण जात होतं.
  • तांत्रिक अडचणी समोर येत होत्या.

ही सर्व स्थिती लक्षात घेऊन शासनाने दोन वेळा मुदतवाढ दिली आहे.
ही वाढ अनेक गरीब कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारी आहे.

घरकुल सर्वे – कसा कराल?

सरकारने घरकुल सर्वेसाठी दोन प्रकार उपलब्ध करून दिले आहेत:

  1. Assistant Survey (सहाय्यक सर्वे) – जिथे अधिकृत कर्मचारी आपलं सर्वेक्षण करतील.(ग्रामसेवक म्हणजे ग्रामविकास अधिकारी यांच्या माध्यमातून सर्वे पूर्ण केला जातो)
  2. Self Survey (स्वयं सर्वे) – जिथे आपण स्वतःच आपल्या मोबाईलद्वारे सर्वे करू शकता. सेल्फ सर्वे कसा करायचा या साठी खालील व्हिडिओ पाहावा. 👇🏻👇🏻👇🏻

Self Survey कसा करावा?

  • आपल्या मोबाईलमध्ये Awas Plus 2024 आणि Aadhaar Face RD ही दोन अ‍ॅप्स इंस्टॉल करा.
  • त्यानंतर सर्व माहिती भरून आपला सर्वे पूर्ण करा.

घरकुल योजनेसाठी पात्रता – तुम्ही पात्र आहात का?

pradhan mantri awas yojana ही योजना सर्वांसाठी नाही. खालील अटी पूर्ण करणारेच यासाठी पात्र ठरतील:

  • भारताचा रहिवासी असणे आवश्यक
  • आधार कार्ड अनिवार्य
  • रोजगार हमी योजनेअंतर्गत नोंदणी असावी (जॉब कार्ड आवश्यक)
  • मासिक उत्पन्न ₹1500 पेक्षा कमी असावे
  • पक्कं घर नसावं
  • कोणतंही चार चाकी किंवा तीन चाकी वाहन नसावं
  • आयकर भरणारा नसावा
  • घरातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत नसावा

निष्कर्ष

घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी हे शेवटचं आणि मोठं संधीचं दार उघडलं आहे.
31 मे 2025 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे – त्यानंतर नोंदणी करता येणार नाही.

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कुणी पात्र असेल, तर आजच सर्वे प्रक्रिया पूर्ण करा आणि सारकरच्या योजनेतून पक्क्या घराच्या दिशेने पहिले पाऊल उचला!

Leave a Comment