pmjay : आयुष्यमान भारत योजना: तुमच्या आरोग्याचे सुरक्षा कवच!

pmjay केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) या नावाने देखील ओळखली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आहे. या योजनेअंतर्गत, पात्र कुटुंबांना प्रतिवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा संरक्षण मिळते. यामुळे गरीब आणि गरजू लोकांना गंभीर आजारांवर मोठ्या रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार करणे शक्य होते.

ही योजना १५ ऑगस्ट २०१८ रोजी सुरू करण्यात आली. आयुष्यमान भारत योजनेत दोन प्रमुख आरोग्य उपक्रमांचा समावेश आहे: पहिले म्हणजे आरोग्य आणि निरोगीकरण केंद्रे स्थापन करणे आणि दुसरे म्हणजे राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना चालवणे. राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा लाभ मिळतो.

pmjay योजनेत काय काय समाविष्ट आहे?

आयुष्यमान भारत योजनेत जवळपास सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार तसेच रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च समाविष्ट आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या योजनेत सुमारे १३५४ पॅकेजेस समाविष्ट केले आहेत. यामध्ये हृदय शस्त्रक्रिया (कोरोनरी बायपास), गुडघे बदलणे आणि स्टंट टाकणे यासारख्या महागड्या उपचारांचाही समावेश आहे. या योजनेत दाखल झाल्यास रूम भाडे, डॉक्टरांची फी, तपासणी खर्च, उपचाराचा खर्च, आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरचा खर्च देखील मिळतो. विशेष म्हणजे, या योजनेत पूर्वीपासून असलेल्या आजारांवर देखील उपचार केले जातात.

कोणाला मिळतो या योजनेचा लाभ?

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष आहेत. मुख्यत्वे, सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणना (SECC) २०११ च्या यादीत ज्या कुटुंबांचे नाव आहे, ते या योजनेसाठी पात्र ठरतात. कुटुंबातील सर्व सदस्य, मग ते कोणत्याही वयाचे असोत, या योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा लाभ घेऊ शकतात.

नोंदणी आणि लाभ कसा घ्यायचा?

आयुष्मान भारत योजनेत नोंदणी करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रीमियमची रक्कम भरावी लागत नाही. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी किंवा योजनेत सहभागी असलेल्या खाजगी रुग्णालयात जावे लागेल. तिथे तुम्हाला ‘आयुष्मान मित्र’ मदत करतील. ते तुमची पात्रता तपासतील आणि योजनेअंतर्गत उपचार मिळण्यास मदत करतील. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.pmjay.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

आयुष्मान भारत योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांसाठी एक वरदान ठरली आहे. यामुळे अनेक गरीब कुटुंबांना वेळेवर आणि चांगल्या दर्जाचे उपचार मिळणे शक्य झाले आहे. त्यामुळे, जर तुमचे नाव २०११ च्या सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणनेत असेल, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्की संपर्क साधा.

Leave a Comment