PM-Kisan शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे. जून 2025 मध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

PM-Kisan महत्त्वाच्या घडामोडी:
पात्र लाभार्थ्यांची तपासणी आणि शुद्धीकरण मोहीम सुरू असून, अनेक राज्यांतून गतीने काम सुरु आहे. अग्रिस्टेक पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे 20 व्या हप्त्यात लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता. 19 व्या हप्त्यात 92.89 लाख लाभार्थ्यांना हप्ता मिळाला होता, तर 20 व्या हप्त्यात ही संख्या 93.50 लाखांहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
31 मे 2025 ही शेवटची तारीख:
31 मे 2025 ही तारीख अग्रिस्टेक पोर्टलवर नोंदणीसाठी निश्चित करण्यात आली आहे.
या तारखेपूर्वी पात्र लाभार्थ्यांनी आपली डिजिटल नोंदणी पूर्ण करून कागदपत्रातील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. आरएफटी (Request For Transfer) साइनिंगची प्रक्रिया सुरू झाली असून, अंतिम यादी लवकरच तयार होणार आहे.
कृषी हंगामाच्या तोंडावर दिलासा:
खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी PM-Kisan आणि नमो शेतकरी महासन्मान निधी दोन्ही योजनेचे हप्ते जून महिन्यात खात्यावर जमा होतील, अशी शक्यता आहे. यामुळे बी-बियाणे खरेदीसाठी आर्थिक आधार मिळेल.
अंतिम निष्कर्ष:
शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अद्याप अग्रिस्टेक नोंदणी केली नसेल किंवा अपात्र दाखवले गेले असाल, तर 31 मेपूर्वी तातडीने त्रुटी दूर करा. योजनेचा लाभ घेण्यासाठी ही एक शेवटची संधी आहे.