pm awas प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढली – आता 31 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत! शेतकरी मित्रांनो व गरजू लाभार्थ्यांनो, जर तुम्ही अजूनही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केलेला नसेल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारने नवीन सर्वे व अर्जासाठीची अंतिम तारीख 16 मे 2025 वरून वाढवून 31 मे 2025 केली आहे.

प्रधानमंत्री आवास या योजनेचे मुख्य फायदे
- ₹2,00,000 पर्यंतचे थेट अनुदान
- स्वतःच्या नावे पक्कं घर बांधण्यासाठी सरकारी मदत
- ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ नागरिकांसाठी योग्य
कोण अर्ज करू शकतो?
- ज्यांचं नाव अद्याप योजनेच्या यादीत नाही
- ज्यांचा अर्ज पूर्वी रिजेक्ट झाला होता किंवा सिस्टममधून गायब झाला असेल
- ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही किंवा कच्चं घर आहे
अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबी
- आधार कार्ड
- कुटुंबातील सर्व सदस्य आधार कार्ड
- मोबाइल क्रमांक
- जॉब कार्ड
- बँक पासबूक
pm awas महत्त्वाचे
शासकीय घरकुल मिळवण्यासाठी वाट पाहणाऱ्या गरजू नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी सर्वेक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा उद्देश गोरगरिब, economically weaker section (EWS) मधील नागरिकांना स्वतःचे घर उपलब्ध करून देणे हा आहे.
या योजनेसाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो, त्यामुळे गरजूंना कुठल्याही कार्यालयात रांगा लावण्याची गरज नाही. फक्त मोबाईल वरुण अर्ज भरता येतो. अर्ज करताना आधार कार्ड, जॉब कार्ड , बँक पासबूक आणि मोबाइल क्रमांक अशी कागदपत्रं आवश्यक असतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे. त्यामुळे ज्या कुटुंबांनी अद्याप अर्ज केला नाही, त्यांनी विलंब न करता लवकर अर्ज करावा. एकदा सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच पुढील टप्प्यात घरकुलाचे मंजुरीचे काम होणार आहे.
टीप:
घरकुल योजनेचा अर्ज करताना चुकीची माहिती देऊ नका. सर्व माहिती अचूक आणि सत्य असावी. अन्यथा अर्ज अपात्र ठरू शकतो. तसेच, स्थानिक पंचायत समिती, नगरपरिषद किंवा ग्रामसेवकाकडून अधिकृत माहिती घ्यावी, जेणेकरून अर्ज प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. मोबाइल च्या माध्यमातून अर्ज कसा करावा या साठी खालील व्हिडिओ पहा.