Mp salary news: खासदाराची झाली पगारवाढ थेट 24000 रुपयांनी वाढले पगार l.

Mp salary news: देशातील खासदार आणि माजी खासदारांसाठी आनंदाची बातमी केंद्र शासनाने दिली आहे. सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी केंद्र शासनाने खासदार व माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये तसेच चालू खासदारांच्या पगारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. पगारा सोबतच खासदारांना मिळणारे वेतन भत्ते देखील वाढवण्यात आले आहेत.

Mp salary news

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पेन्शन मध्ये देखील झाली वाढ Mp salary news

केंद्र सरकारने घेतलेले या नवीन निर्णयानुसार खासदारांच्या पगारात थेट 24 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता देशातील खासदारांना 1 लाख 24 हजार रुपये एवढे प्रति महिना मानधन वितरित केले जाणार आहे. खासदारासोबतच माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. यानुसार माजी खासदारांना 25 हजार रुपायांवरून आता 31 हजार रुपये एवढे पेन्शन वितरित केले जाणार आहे.

हे वाचा: जिवंत सातबारा मोहीम

कधी पासून लागू होणार हे पेन्शन

देशातील खासदारांना लागू केलेले नवीन वेतनवाढ धोरण हे एक एप्रिल 2023 पासून लागू करण्यात येणार आहे. देशातील खर्च आणि महागाई निर्देशांच्या आधारे हा पगार वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये दर पाच वर्षांनी खासदारांचे वेतन आणि भत्ते याचे दर ठरवले जातात. यापूर्वी 2018 मध्ये अशा पद्धतीची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुढील पाच वर्षानंतर म्हणजे 2023 पासून हा नियम लागू केला जाणार आहे. Mp salary news

आणखी कोणते लाभ मिळतात

पगारा सोबतच खासदार यांना अनेक सुविधा आणि लाभ तसेच भत्ते वितरित केले जातात. प्रत्येक खासदाराला प्रत्येक महिन्याला 70 हजार रुपये निर्वाचन क्षेत्र भत्ता म्हणून दिले जातात. यासोबतच दिल्लीमध्ये राहण्याचे ठिकाण आणि दिल्लीतील कार्यालयाचे टेलिफोन बिल भरावे लागत नाही. खासदारांना साठ हजार रुपये कार्यालयीन भत्ता देखील दिला जातो. रेल्वेच्या फर्स्ट क्लास एसी किंवा एक्झिक्युटिव्ह क्लास मधून मोफत प्रवासाची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. यासोबतच काही कामा निमित्त बाहेरील देशात प्रवास करण्यासाठी देखील खासदारांना प्रवास भत्ता वितरित केला जातो. खासदारांना मोफत वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येते.

1 thought on “Mp salary news: खासदाराची झाली पगारवाढ थेट 24000 रुपयांनी वाढले पगार l.”

Leave a Comment