Mini Tractor Yojana 2025: मिनी ट्रॅक्टर साठी 90 टक्के अनुदान! ऑनलाईन अर्ज सुरु…

Mini Tractor Yojana 2025 : शेत यंत्रणा आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या मिनी ट्रॅक्टर योजना 2025 अंतर्गत आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी तब्बल ९० टक्के अनुदान मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेत पात्र ठरलेल्या बचत गटांना ३ लाख १५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. विशेष बाब म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटांमध्ये ८० टक्के सदस्य नवबौद्ध आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. सध्या नांदेड जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून २०२५ आहे.

मिनी ट्रॅक्टर योजना २०२५ चा मुख्य उद्देश हा शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि लहान तसेच मध्यमवर्गीय शेतकऱ्यांच्या कामांना गती देणे आहे. आता या योजनेत बचत गटांना सहभागी करून घेतल्यामुळे, अनेक कुटुंबांना एकत्र येऊन या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत मिनी ट्रॅक्टर खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा ३ लाख ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे, ज्यामध्ये पात्र गटांना ९० टक्के म्हणजेच ३ लाख १५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. Mini Tractor Yojana 2025

योजनेसाठी पात्रता:

या योजनेचा लाभ फक्त बचत गटांना म्हणजेच स्वयंसहाय्यता गटांना दिला जाणार आहे. स्वयंसहाय्यता गटामध्ये कमीत कमी ८० टक्के सदस्य हे नवबौद्ध व अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे. मिनी ट्रॅक्टर खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा ३ लाख ५० हजार रुपये आहे.Mini Tractor Yojana 2025

अर्ज कुठे कराल आणि शेवटची तारीख:

मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Yojana 2025) योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात उपलब्ध आहे. इच्छुक लाभार्थी या कार्यालयात ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. जरी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू असली तरी, अर्ज स्वीकारण्याच्या तारखांमध्ये थोडाफार बदल संभवतो.

सध्या, नाशिक जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु झाले आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील इच्छुक बचत गटांनी या मुदतीत आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर, ऑनलाईन अर्जाची प्रिंट आणि अर्जासोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत संबंधित कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक लाभार्थी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधू शकतात किंवा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.Mini Tractor Yojana 2025

शेतीमध्ये मिनी ट्रॅक्टरची उपयुक्तता:

आधुनिक शेतीत मिनी ट्रॅक्टरचे महत्व अनमोल आहे. शेतीत आधुनिकीकरणामुळे आता अनेक प्रकारची कामे मिनी ट्रॅक्टरच्या मदतीने करणे शक्य झाले आहे. पूर्वी बैलांच्या साहाय्याने केली जाणारी नांगरणी, वखरणी, कोळपणी यांसारखी कामे आता मिनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने कमी वेळेत आणि कमी श्रमात करता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचतो आणि उत्पादनात वाढ होते.

शेतीमधील छोटी-छोटी कामे अधिक सोप्या पद्धतीने करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यास उत्सुक आहेत. आता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी ९० टक्के अनुदान मिळत असल्यामुळे, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या शेतकऱ्यांसाठी देखील हा मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Yojana 2025) खरेदी करणे अधिक सोपे झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील ज्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे 30 जून २०२५ च्या अंतिम तारखेपूर्वी आपले अर्ज निश्चित वेळेत सादर करावेत, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. शासनाने सुरु केलेली ही योजना निश्चितच गरजू आणि पात्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल, यात शंका नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र बचत गटांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभाग, नाशिक येथे संपर्क साधावा. Mini Tractor Yojana 2025

Leave a Comment