mahresult.nic.in 2025 आजचा दिवस 10 वी चे असणारे विद्यार्थी यांच्या साठी एक खास दिवस आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच MSBSHSE आज दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर करत आहे. तुम्ही सगळ्यांनी वर्षभर अभ्यास केला, परीक्षा दिल्या आणि आता त्या मेहनतीचं फळ मिळणार आहे.
या वर्षी जवळपास १६ लाख विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. त्यामुळे आज सगळ्या घरोघरी आणि शाळांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. निकाल कसा लागेल, किती टक्के मिळतील, पुढे काय करायचं – हे सगळं आज स्पष्ट होणार आहे. पण त्याआधी महत्त्वाचं म्हणजे – निकाल कसा पाहायचा हे माहिती असणं खूप गरजेचं आहे.
निकाल पाहायचा आहे? तर आधी हे तयार ठेवा
mahresult.nic.in 2025 निकाल पाहण्यासाठी काही गोष्टी तुमच्याकडे तयार असल्या पाहिजेत. नाहीतर वेबसाइटवर गेल्यावर अडचण येऊ शकते.
✅ हॉल तिकीट: तुम्ही परीक्षेला बसलात तेव्हा जे हॉल तिकीट दिलं होतं, ते जवळ ठेवा.
✅ रोल नंबर: हॉल तिकिटावर लिहिलेला नंबर हवा असतो.
✅ आईचं नाव: आईचं फक्त पहिलं नाव टाकायचं असतं, ते देखील हॉल तिकिटावर असतं.
✅ मोबाईल किंवा संगणक: निकाल पाहण्यासाठी इंटरनेट लागणार आहे.
हे सगळं तयार ठेवलं की तुम्ही निकाल पाहायला तयार आहात. आता पाहूया तो कसा पाहायचा.
mahresult.nic.in 2025 निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स – चुकूनही दुसऱ्या वेबसाइटवर जाऊ नका!
दहावीचा निकाल पाहण्यासाठी फक्त अधिकृत आणि सरकारी वेबसाइट्सच वापराव्यात. कारण काही वेळा खोट्या वेबसाइट्सवर फसवणूक केली जाते. खाली दिलेल्या वेबसाइट्स सरकारच्या अधिकृत आहेत:
🌐 https://www.mahahsscboard.in
🌐 http://www.sscresult.mkcl.org
🌐 https://sscresult.mahahsscboard.in
🌐 https://results.digilocker.gov.in
या पैकी कोणतीही वेबसाइट उघडा आणि ‘SSC March 2025 Result’ या लिंकवर क्लिक करा. नंतर रोल नंबर आणि आईचं नाव भरून Submit करा. मग तुमचा निकाल समोर स्क्रीनवर दिसेल.
निकाल कसा पाहायचा? – mahresult.nic.in 2025
असं समजा की, तुम्ही https://mahresult.nic.in या वेबसाइटवर गेला आहात. आता निकाल पाहण्यासाठी पुढचं काय करायचं हे खाली दिलं आहे:
- वेबसाइट उघडा.
- “SSC Examination March 2025 Result” या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर (हॉल तिकिटावरून) आणि आईचं नाव टाका.
- “Submit” किंवा “View Result” या बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- तो डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
निकाल पाहण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही. इंटरनेट असले की घरबसल्या मोबाईलवरही निकाल पाहू शकता.
मोबाईलवर SMS किंवा DigiLocker वापरून निकाल कसा पाहावा?
जर तुमच्याकडे इंटरनेट नसल्यास, तरीही काळजी करू नका. तुम्ही SMS किंवा DigiLocker वापरून निकाल पाहू शकता.
SMS ने निकाल पाहण्यासाठी:
- तुमच्या मोबाइलमध्ये नवीन मेसेज उघडा.
- असा टाईप करा: MHSSC <रोल नंबर>
- हा मेसेज पाठवा 57766 या क्रमांकावर.
- काही वेळात तुमचा निकाल तुमच्या मोबाइलवर येईल.
DigiLocker द्वारे निकाल पाहण्यासाठी:
- https://results.digilocker.gov.in या वेबसाइटवर जा.
- “Maharashtra SSC 2025 Result” या लिंकवर क्लिक करा.
- रोल नंबर आणि आईचं नाव भरून Submit करा.
- निकाल स्क्रीनवर येईल आणि तुम्ही तो डाउनलोड करू शकता.
mahresult.nic.in 2025