Maharashtra SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार – येथे पाहता येणार निकाल.

Maharashtra SSC Result 2025 महाराष्ट्र राज्यातील दहावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. SSC म्हणजेच दहावीच्या 2025 च्या परीक्षा फेब्रुवारी ते मार्च महिन्यात यशस्वीरीत्या पार पडल्या होत्या. या वर्षी परीक्षा लवकर झाल्यामुळे निकालही वेळेत लावण्यात येणार असल्याची माहिती आधीच समोर आली होती. अखेर आता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून, दहावी निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.

Maharashtra SSC Result 2025

कधी होणार दहावीचा निकाल जाहीर?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, SSC Result 2025 दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.

प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षी देखील निकाल ऑनलाईन स्वरूपात पाहता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांनीही तयार राहणे गरजेचे आहे.

निकाल कोठे पाहता येईल? (Maharashtra SSC Result 2025 Websites)

दहावीचा निकाल खाली दिलेल्या संकेतस्थळांवर उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनी या वेबसाइट्सपैकी कुठल्याही एका लिंकवर जाऊन निकाल पाहता येतो:

🔹 https://results.digilocker.gov.in/
🔹 https://www.mahahsscboard.in/
🔹 https://sscresult.mkcl.org/
🔹 https://results.targetpublications.org/
🔹 https://results.navneet.com/
🔹 https://www.tv9hindi.com/education/board-exam/maharashtra-board-exam

या संकेतस्थळांवर 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून निकाल उपलब्ध होईल.

निकाल कसा पाहावा? (SSC Result 2025 Check करण्याची प्रक्रिया)

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील सोप्या स्टेप्स फॉलो कराव्यात:

  1. वर दिलेल्या कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करा.
  2. वेबसाईट उघडल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.
  3. त्या पेजवर तुमचा SSC रोल नंबर टाका.
  4. पुढे तुमच्या आईचे नाव भरावे लागेल (आईचे नाव इंग्रजीत योग्य स्पेलिंगसह लिहा).
  5. माहिती भरल्यानंतर “Submit” किंवा “View Result” या बटणावर क्लिक करा.
  6. काही क्षणात तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  7. निकाल PDF स्वरूपात सेव करू शकता किंवा लगेच प्रिंट घेऊ शकता.

विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

  • निकाल पाहताना इंटरनेट कनेक्शन चांगलं असावं.
  • निकाल जाहीर होताच वेबसाइटवर लोड वाढू शकतो, त्यामुळे थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे.
  • निकालाची PDF किंवा प्रिंट आपल्या कडे ठेवा, पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला उपयोगी पडते.
  • काही वेळेस एकाच संकेतस्थळावर तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे इतर पर्यायी वेबसाइट्स वापराव्यात.

विद्यार्थ्याची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल म्हणजे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असतो. त्यामुळे या निकालाची उत्सुकता आणि भीती दोन्ही विद्यार्थी यांच्या मनात असते. पण, 13 मे 2025 रोजी निकाल जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या निकालासाठी खूप शुभेच्छा!

Leave a Comment