mahajyoti tab राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती संस्थेमार्फत एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही संधी आहे अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षेच्या मोफत ऑनलाइन प्रशिक्षणाची.

mahajyoti tab महाज्योती संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट व एमएचटी-सीईटी परीक्षांसाठी 18 महिन्यांचे मोफत ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट व दररोज 6 GB इंटरनेट सुविधा मिळणार आहे.
शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी किमान 70% आणि ग्रामीण भागासाठी 60% गुण आवश्यक आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2025 असून निवड 10 वीच्या गुणांच्या आधारे व आरक्षणानुसार होणार आहे. ही संधी घरबसल्या उच्च शिक्षणासाठी तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
प्रशिक्षणाचे स्वरूप काय असेल?
या उपक्रमांतर्गत १८ महिन्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट आणि दररोज 6 GB इंटरनेट डेटा देखील पुरवण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना जेईई, नीट किंवा एमएचटी-सीईटीसारख्या परीक्षांची तयारी योग्य पद्धतीने करता यावी यासाठी राबवले जात आहे.
पात्रता कोण मिळवू शकतो?
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) किंवा विशेष मागास प्रवर्गातला नॉन क्रिमी लेयर गटातील असावा.
- उमेदवाराने 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी किमान 70% आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी किमान 60% गुण आवश्यक आहेत.
- उमेदवाराने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतील?
- आधारकार्ड किंवा मतदान ओळखपत्र
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र
- 10 वीचे शैक्षणिक गुणपत्रक
mahajyoti tab अर्ज कोठे करावा
अर्ज करण्यासाठी https://neet.mahajyoti.org.in/2025/mobile_verification.php या संकेतस्थळावर सुरू झालेले आहेत. आपण या घटकासाठी पात्र असल्यास आपण या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता.
mahajyoti tab निवड कशी होईल?
- महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.
- अर्जाची छाननी करून, 10 वी च्या गुणांच्या आधारे व संवर्गानुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2025 आहे.
आरक्षण किती आणि कुणासाठी?
- इतर मागासवर्ग – 59%
- विमुक्त जाती – 10%
- भटक्या जमाती ‘ब’ – 8%, ‘क’ – 11%, ‘ड’ – 6%
- विशेष मागास प्रवर्ग – 6%
- महिलांसाठी 30%, दिव्यांगांसाठी 4% आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी 1% आरक्षण आहे.
mahajyoti tab महत्त्वाची टीप:
या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ पण हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षांची मोफत तयारी करून देणे आहे. हे प्रशिक्षण घरबसल्या, मोबाईलवर किंवा टॅब्लेटवर करता येईल. ही संधी गमावू नका – वेळेत अर्ज करा!
जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कमेंट करा, आम्ही तुमच्यासाठी पुढील माहिती आणू.