mahadbt portal : शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल सुरू ; असा करा अर्ज..

mahadbt portal : शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकच ठिकाणावरून उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरू केले. या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना शेती प्रस्थानासाठी यांत्रिकीकरण असेल. सूक्ष्म सिंचन, बी बियाणे, रासायनिक खते, शेती आवश्यक अवजारे, पीक संरक्षण उपक्रम अशा विविध घटकांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले. या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड ही लकी ड्रॉ पद्धतीने केली जाते. लकी ड्रॉ पद्धतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांना अर्ज केलेला घटकासाठी शासनाकडून अनुदान वितरित केले जाते.

मधील काही काळामध्ये शेतकऱ्यांसाठी हे पोर्टल बंद करण्यात आले होते. पोर्टल आता नव्याने शेतकऱ्यांसाठी सुरू झाले आहे शेतकरी या पोर्टलच्या माध्यमातून हव्या असणारे घटकासाठी अर्ज देखील सादर करू शकतात. शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

का बंद झाले होते पोर्टल

दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर पोर्टल मधील निर्माण झालेल्या त्रुटी दूर करण्यासाठी पोर्टल दुरुस्ती प्रक्रिया राबवली जाते. नवीन अर्ज करणे किंवा जुन्या अर्थाची तपशील माहिती पाहणे या सर्व प्रक्रिया बंद केल्या जातात. यामुळे हे पोर्टल पूर्णपणे बंद ठेवण्यात येते. पोर्टल वरील पूर्ण कामकाज पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पूर्ववत सर्व शेतकऱ्यांसाठी सुरू केली जाते. या पोर्टलच्या दुरुस्तीसाठी हे पोर्टल बंद करण्यात आले होते. आवश्यक असणारे बदल करून पोर्टल अपडेट करून नव्याने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पोर्टलवर आवश्यक असणारे बदल करण्यासाठी हे पोर्टल बंद ठेवण्यात आले होते.

हे पण वाचा:
Pm kisan Pm kisan पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता जूनमध्ये.

कोणत्या घटकासाठी शेतकऱ्यांना करता येतील अर्ज

महाडीबीटी पोर्टलच्या mahadbt portal माध्यमातून शेतकरी विविध घटकांसाठी अर्ज सादर करू शकतात. ज्यामध्ये शेतकऱ्यांना खालील घटकांसाठी अर्ज सादर करता येतो व अनुदान मिळवता येते. महाडीबीटी चे अंतर्गत कोणकोणत्या घटकांतर्गत अनुदान मिळवता येते त्यांची यादी खालील प्रमाणे:-

  • ट्रॅक्टर
  • पावर टिलर
  • पावर टिलर चलीत अवजारे
  • ट्रॅक्टर चलीत अवजारे (नांगर, रोटावेटर, पेरणी यंत्र इत्यादी)
  • मनुष्य चलित अवजारे
  • फलोत्पादन यंत्र
  • पीक काढणी आवश्यक यंत्र
  • विविध पीक प्रक्रिया संच
  • सूक्ष्म सिंचन(ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, रेनगन)

या व यासारख्या अनेक घटकासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या (mahadbt portal ) माध्यमातून अर्ज सादर करता येतो. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना या पोर्टलच्या माध्यमातून शासनाकडून अर्ज केलेल्या घटकासाठी अनुदान दिले जाते. वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळे अनुदान शासनाने ठरवून दिलेले आहे. त्यानुसार पात्र असणारे शेतकऱ्यांना हे अनुदानित केले जाणार आहे.

अर्ज कसा करावा ? mahadbt portal

mahadbt portal शेतकऱ्यांना या घटकासाठी अर्ज करायचा असल्यास आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर जावे लागेल. महाडीबीटी पोर्टल वर गेल्यानंतर शेतकरी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागेल. शेतकरी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हव्या असणाऱ्या घटकासाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला अर्जासाठी आवश्यक असणारी फीस देखील भरणे आवश्यक आहे. अर्जासाठी आवश्यक असणारी फीस भरल्यानंतर आपला अर्ज लॉटरीसाठी पात्र ठरवला जातो. लकी ड्रॉ पद्धतीने याची लॉटरी निवड प्रक्रिया केली जाते. ज्या शेतकऱ्यांची लॉटरी अंतर्गत निवड होईल त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

हे पण वाचा:
irrigation system irrigation system : क्षारयुक्त पाण्यामुळे शेतीला काय तोटा होतो.

Leave a Comment