lek ladki yojana : मुलींना मिळणार 1 लाख रुपयांची मदत.

lek ladki yojana मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाची आणि मोठ्या आर्थिक लाभाची योजना सुरू केली आहे – लेक लाडकी योजना. या योजनेअंतर्गत, पात्र मुलींना एकूण ₹1,01,000 इतकी रक्कम हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे. शासन निर्णयानुसार, ही योजना 1 एप्रिल 2023 पासून राज्यात प्रभावी झाली आहे. मात्र अनेकांना अजूनही प्रश्न आहे की, पात्रता काय आहे? अर्ज कसा करायचा? कोणती कागदपत्रं लागतात? आणि फॉर्म कुठे भरायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या लेखात सविस्तरपणे पाहणार आहोत.

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना आहे, ज्यामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी एकूण ₹1,01,000 इतकी आर्थिक मदत हप्त्यांमध्ये दिली जाते. ही मदत मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षांपर्यंत विविध शैक्षणिक टप्प्यांनुसार दिली जाते. यासाठी लाभार्थी कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं, वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा कमी असणं, आणि काही ठराविक अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. अर्ज फक्त अंगणवाडी सेविकेमार्फत सादर केला जातो. त्यामुळे जर तुमच्या घरी 1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्मली असेल, तर ही योजना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे

लेक लाडकी योजना नेमकी आहे काय?

lek ladki yojana लेक लाडकी योजना ही पूर्वीच्या माझी कन्या भाग्यश्री योजनेचा सुधारित आणि विस्तारित स्वरूप आहे. आता ही योजना केवळ मर्यादित भागापुरती नसून संपूर्ण राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांतील मुलींसाठी लागू करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ कसा मिळतो?

या योजनेअंतर्गत, मुलीच्या शिक्षणाच्या विविध टप्प्यांनुसार आर्थिक सहाय्य दिलं जातं. एकूण हप्त्यांची रचना अशी आहे:

  • जन्म नंतर: ₹5,000
  • 1 लीत प्रवेश घेतल्यावर: ₹4,000
  • 6वीत गेल्यावर: ₹6,000
  • 11वीत गेल्यावर: ₹7,000
  • 18 वर्ष पूर्ण झाल्यावर (अंतिम हप्ता): ₹55,000
  • एकूण रक्कम: ₹1,01,000

योजना कोणासाठी लागू आहे? (पात्रता निकष)

ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठी लागू आहे, आणि खालील अटी पूर्ण करणं आवश्यक आहे:

1. पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असलेलं कुटुंब
2. मुलगी महाराष्ट्रात जन्मलेली आणि महाराष्ट्रची रहिवासी असावी
3. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ₹1,00,000 पेक्षा कमी असणं आवश्यक
4. मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा
5. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आवश्यक (दुसऱ्या अपत्यासाठी)
6. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर शेवटचा हप्ता मिळवण्यासाठी – मुलीचं लग्न झालेलं नसावं

अर्ज कोण आणि कुठे करणार?

अर्ज मुलीच्या जन्माच्या वेळी पालकांनी करायचा असतो. अर्ज फक्त अंगणवाडी सेविकेकडे सादर करायचा आहे. अर्ज ऑफलाइन असतो, पण सेविकेकडून तो ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केला जातो.

अर्ज करताना लागणारी 10 महत्वाची कागदपत्रं

1. मुलीचं जन्म प्रमाणपत्र
2. मुलीचा आणि पालकांचा आधार कार्ड
3. पिवळं/केशरी रेशन कार्ड
4. बँक पासबुकची प्रत (मुलीच्या किंवा पालकांच्या नावे)
5. वय प्रमाणपत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र (शिक्षण हप्त्यासाठी)
6. मतदान यादीत नाव (18 वर्ष पूर्ण झाल्यावर)
7. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र
8. स्वघोषणापत्र (लग्न झालेलं नसल्याचं)
9. अर्ज नमुना (GR मधून मिळतो)
10. संबंधित शाळेचा दाखला (शैक्षणिक टप्प्यांसाठी)

अर्ज भरण्याची पद्धत

1. मुलीचा जन्म झाल्यावर अंगणवाडी सेविकेला माहिती द्या
2. ती तुम्हाला लेक लाडकी योजनेसाठी अर्ज नमुना देईल
3. सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडून सेविकेकडे जमा करा
4. सेविका फॉर्म ऑनलाइन पोर्टलवर भरते आणि फॉरवर्ड करते
5. एक महिन्याच्या आत प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित आहे

महत्त्वाचं: पूर्वी जन्मलेल्या मुलींना काय?

जर 1 एप्रिल 2023 पूर्वी मुलीचा जन्म झाला असेल, तर त्या मुलीला ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ अंतर्गत लाभ मिळतो. मात्र, अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 होती. त्यानंतर माझी कन्या भाग्यश्री योजना मध्ये अर्ज स्वीकारले जात नाहीत.

फॉर्म भरताना लक्षात ठेवाव्यात ‘या’ गोष्टी

  • फॉर्म योग्य त्या अंगणवाडी सेविकेकडेच सादर करावा
  • सर्व कागदपत्रं अपलोडसाठी स्कॅन स्वरूपात तयार ठेवावीत
  • माहितीमध्ये चूक झाल्यास सेविकेकडून लगेच दुरुस्ती करावी
  • IFSC कोड, बँक खाते नंबर, आधार नंबर योग्य असावा

या योजनेचा उद्देश म्हणजे:

  • मुलींच्या जन्माचे स्वागत
  • मुलींच्या शिक्षणात अडथळे दूर करणे
  • अल्प उत्पन्न कुटुंबांना आर्थिक आधार देणे
  • कुपोषण, बालविवाह, आणि शालेय गळती थांबवणे

lek ladki yojana निष्कर्ष

जर तुम्ही या योजनेचे निकष पूर्ण करत असाल, तर ही योजना मुलीच्या भविष्यासाठी खूपच फायदेशीर आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य याचा त्रिसूत्री लाभ मिळणार आहे. एक लक्ष एक हजार रुपये म्हणजे केवळ रक्कम नाही, तर सरकारचा मुलींसाठीचा वचनबद्ध पाठिंबा आहे.

Leave a Comment