Ladki Bahin Yojna: आता लाडक्या बहिणींना देणार व्यवसायासाठी 50,000 रुपये कर्ज – महिलांसाठी मोठी संधी..!

Ladki Bahin Yojna : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही केवळ आर्थिक सहाय्य देणारी योजना नाही, तर महिलांना सक्षम बनवणारा एक मोठा उपक्रम आहे. याअंतर्गत दरमहिना ₹1,500 मदत दिली जातेच, पण आता या योजनेमध्ये आणखी एक महत्त्वाची सुविधा जोडली जाणार आहे. ती सुविधा म्हणजे , महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी ₹50,000 पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आणे अशी घोषणा करण्यात आली आहे. Ladki Bahin Yojna

Ladki Bahin Yojna

या कर्जाचा फायदा कोणाला होणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे की, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना लघुउद्योग, गृहउद्योग, सेंद्रिय शेती, अन्न प्रक्रिया, शिवणकाम, कुटीर उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹50,000 पर्यंतचे कर्ज दिले जाईल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या कर्जाचे हप्ते महिलांनी भरायचे नसून त्याची परतफेड ‘लाडकी बहीण योजना’तूनच केली जाणार आहे. म्हणजे महिलांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न पडता त्यांना व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे. Ladki Bahin Yojna

हे वाचा : शेतकऱ्यांसाठी महाविस्तार’ अ‍ॅपचा वापर का गरजेचा आहे?

पात्रता आणि निकष काय आहे?

या कर्जाचा लाभ घेणेयासाठी महिलाना काही खाली दिलेले पात्रता आणि निकष पूर्ण करावी लागतील .

  • वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असावे
  • अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी
  • वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे
  • सरकारी कर्मचारी नसलेले, आयकर न भरलेले कुटुंब असावे
  • कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन नोंदणीकृत नसावे (ट्रॅक्टर वगळता)
  • विवाहित, घटस्फोटित, विधवा किंवा कुटुंबातील एकमेव अविवाहित महिला असावी.

या योजनेचा परिणाम काय होईल?

या कर्ज सुविधेमुळे महिलांना आपल्या पायावर उभं राहता येईल, छोटा व्यवसाय सुरू करता येईल, आणि आर्थिक दृष्ट्या कुटुंबाला हातभार लावता येईल. विशेषतः ग्रामीण व निमशहरी भागात जिथे महिलांना रोजगाराच्या संधी कमी आहेत, तिथे ही योजना आशेचा किरण ठरणार आहे. Ladki Bahin Yojna

शेवटी एक विनंती

महिला भगिनींनो, हे तुमच्या स्वप्नांची सुरुवात असू शकते. जर तुमच्यात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असेल, पण पैशाची अडचण असेल, तर ही संधी दवडू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. आजच अर्ज करा आणि तुमचा उद्योग सुरू करण्याचा पहिला टप्पा पार करा. Ladki Bahin Yojna

Leave a Comment