ladki bahin yojana april 2025 installment date : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली. योजनेचे अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वितरित केला जाईल अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आणि तटकरे यांनी दिली होती. आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना हप्ता वितरणा बाबतची माहिती दिली असली तरी देखील अद्याप पर्यंत महिलांच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली नाही. अनेक महिलांच्या मनात एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार अशी शंका सुरू झाली आहे.

जुलै 2024 पासून राज्यातील लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात. आतापर्यंत महिलांना एकूण नऊ हप्त्याचे यशस्वीरित्या वितरण करण्यात आले आहे. नऊ हप्त्याच्या माध्यमातून महिलांना आतापर्यंत 13500 प्रति महिला या प्रमाणात निधी जमा करण्यात आला आहे. महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप पर्यंत मिळालेला नाही.
कधी मिळेल एप्रिल महिन्याच्या हप्ता ladki bahin yojana april 2025 installment date
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाईल अशी माहिती देण्यात आली होती. माहिती दिली असली तरी देखील राज्यातील कोणत्याही महिलेला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हप्ता जमा झाला नाही. या हप्त्याबाबत अनेक महिलांच्या मनात आता शंका निर्माण होत आहे.
एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप करण्यापूर्वी लाडक्या बहिणीची उत्पन्नाची तपासणी केली जाणार अशी माहिती देण्यात आली होती. अद्याप पर्यंत ही तपासणी पूर्ण झाली नसल्याने राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप करण्यात आला नाही. परंतु लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून शासनाकडून एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप केला जाईल. एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप करण्याबाबतची अद्याप स्पष्ट तारीख सांगण्यात आलेली नाही. परंतु तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल.
एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्ता सोबतच
मागील अनेक वेळा शासनाकडून आता वितरणास विलंब झाल्यास दोन महिन्याचा हप्ता एक सोबत वितरित करण्यात आलेला आहे. त्यानुसारच सरकार यावेळी देखील दोन हप्त्याचे वितरण एक सोबत करेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. सरकार दोन महिन्याचे हप्ते म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एक सोबत वाटप करेल अशी अपेक्षा आहे. दोन्ही महिन्याचे हत्ती वाटप करण्याबाबत अद्याप पर्यंत कोणतेही स्पष्टता देण्यात आलेली नाही. परंतु मागील प्रक्रियेनुसार शासन यावेळी देखील दोन महिन्याचे हप्ते एक सोबत वितरित करू शकते.
सरकारने याआधी तीन वेळा महिलांना एक सोबत दोन महिन्याच्या हप्ते वितरित केलेले आहेत. त्या अनुषंगानेच एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्ते देखील शासन महिलांच्या बँक खात्यावर एक सोबत जमा करू शकते. शासनाने हाती घेतलेली महिलांचे उत्पन्न तपासणी मोहीम पूर्ण झाल्यानंतर महिलांना एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो.
कोणत्या महिलांना मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता
अनेक माध्यमातून अनेक बातम्या पसरवल्या जात आहेत. ज्याच्या माध्यमातून महिलांना लाडकी बहीण योजना मधून वगळण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. परंतु राज्य शासनाने असे स्पष्ट केले आहे की ज्या महिला शासन निर्णयानुसार पात्र असतील त्या कोणत्याही महिलेला या योजनेच्या अंतर्गत वगळले जाणार नाही. अपात्र असणाऱ्या महिलांची तपासणी करून त्या महिला योजनेमधून वगळण्यात येतील. परंतु योजनेत पात्र असणाऱ्या कोणत्याही महिलेचे पैसे थांबवले व बंद केले जाणार नाही.
ज्या महिला पूर्णपणे लाडकी बहीण योजना नियम व अटीचे पालन करतात आणि पात्रतेचे अनुकरण करतात त्या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप केले जाणार आहेत. शासनाच्या तपासणी मोहिमेमुळे लाडक्या बहिणींना हप्ता वितरित करण्यास विलंब होत आहे. परंतु सरकार पात्र असणाऱ्या सर्व महिलांना सर्व महिन्यांचा लाभ वितरित करण्यात सक्षम असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.