लाडकी बहीण योजना 11 हप्ता कधी?

लाडकी बहीण योजना मे महिना संपत आला, हप्ता अजूनही मिळालेला नाही? लाखो महिलांना लाभ देणाऱ्या लाडकी बहिणी योजना अंतर्गत मे महिन्याचा (11 वा) हप्ता अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. याबाबत कोणतंही स्पष्ट सरकारी वक्तव्य अजून आलेलं नसून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडूनही कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

मागील हप्त्यांचा ट्रेंड काय सांगतो?

पूर्वीचे हप्ते 19 ते 24 तारखेदरम्यान वितरित होत होते.काही वेळा 21, 22, 23 तारखेला हप्ते आलेले आहेत.मात्र मागील 1-2 महिने वितरण टोकाला गेलंय – महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा पुढच्या महिन्यात ढकललं जातं.

लाडकी बहीण योजना यावेळेस वितरण लवकर होणार का?

18 ते 22 मे दरम्यान जर अधिकृत विधान आलं, तर वितरण लवकर होण्याची शक्यता वाढते.28, 29 आणि 31 मे या तारखा वितरणासाठी संभाव्य आहेत. 31 मे ही अहिल्याबाई होळकर यांची जयंती, त्यामुळे हप्त्याच्या वितरणासाठी ती तारखाही महत्त्वाची आहे.

DBT (Direct Benefit Transfer) स्टेटस तपासा

लाडकी बहीण योजना एप्रिलमध्ये अनेक बहिणींना हप्ता मिळालेला नाही, कारण त्यांचं DBT स्टेटस इनॲक्टिव्ह होतं.NPCI च्या वेबसाइटवरून DBT स्टेटस तपासा.जर ते इनॲक्टिव्ह असेल, तर लवकरात लवकर बँकेतून दुरुस्त करून घ्या.

पेंडिंग लाभ – पिंक रिक्षा आणि साडीचं वितरण

पिंक कार्ड रिक्षा योजनेचं वितरण थांबलेलं होतं, पण लवकरच नवीन अर्ज सुरू होण्याची शक्यता आहे. केसरी रेशन कार्डधारक महिलांना मोफत साडीचं वितरण अजून पूर्ण झालेलं नाही – विशेषतः एका कुटुंबात दोन लाडक्या बहिणी असतील, तर फक्त एकालाच लाभ मिळतो.

निष्कर्ष

लाडकी बहिणी योजना हप्ता मे महिन्यातच मिळावा, यासाठी शक्यतो 28 ते 31 मे या तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.जर पुढील काही दिवसांत कोणतंही अधिकृत विधान आलं नाही, तर वितरण पुन्हा पुढे जाऊ शकतं.

Leave a Comment