kukkutpalan yojana 2025 कोंबड्यांचे मोफत वाटप सुरू! ‘कुक्कुटपालन योजना 2025’ अर्ज सुरू

kukkutpalan yojana 2025 राज्यात कोंबड्यांचे मोफत वाटप सुरू झाले असून, ‘कुक्कुटपालन योजना 2025’ अंतर्गत तलंगा जातीच्या २५ माद्या व ३ नर कोंबड्यांचा संच अनुदानित दरात दिला जात आहे. एकूण प्रकल्प खर्च ₹10,840 असून त्यापैकी ५०% म्हणजेच ₹5,420 इतकं शासकीय अनुदान मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया 1 जून 2025 पर्यंत सुरू असून, महिला, बेरोजगार युवक, अल्पभूधारक व गरजू शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर जाऊन किंवा AH-MAHABMS अ‍ॅपवरून अर्ज करता येतो. ही योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीपूरक उत्पन्नाची उत्तम संधी देणारी आहे.

राज्यातील ग्रामीण शेतकरी, महिला बचत गट, आणि बेरोजगार तरुण-तरुणींसाठी एक मोठी संधी आली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत ‘कुक्कुटपालन योजना 2025’ अंतर्गत कोंबड्यांचे अनुदानित वाटप सुरू झाले आहे. या योजनेमुळे अल्प गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो.

अर्ज प्रक्रिया सुरू – शेवटची तारीख 1 जून 2025

2 मे 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी 1 जून 2025 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज लवकर केल्यास निवडीत संधी अधिक मिळण्याची शक्यता असते.

कोणती कोंबडी मिळणार? kukkutpalan yojana 2025

योजनेअंतर्गत तलंगा जातीच्या 25 माद्या आणि 3 नर कोंबड्यांचे वाटप होणार आहे. ही जात कमी देखभाल लागणारी, मजबूत प्रतिकारशक्ती असलेली आणि ग्रामीण भागात सहज जुळणारी आहे.

एकूण प्रकल्प खर्च आणि अनुदान

  • एकूण प्रकल्प खर्च: ₹10,840
  • शासकीय अनुदान: 50% (₹5,420 पर्यंत)
  • लाभार्थ्याचा स्वहिस्सा: अंदाजे ₹5,420

कोण पात्र आहे?

योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहे:

  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंब
  • अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी
  • स्वयंरोजगारासाठी नोंदणी केलेले बेरोजगार युवक/युवती
  • महिला बचत गटातील सदस्य

यामध्ये 30% आरक्षण महिलांसाठी ठेवण्यात आले आहे.

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 7/12 उतारा
  • 8अ उतारा
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील
  • रेशन कार्ड
  • अपत्य दाखला
  • जात प्रमाणपत्र (असल्यास)
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र

अर्ज कोठे आणि कसा करायचा?

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ:
https://ah.mahabms.com

मोबाईल अ‍ॅप: AH-MAHABMS (Google Play Store वरून डाऊनलोड करा)

या दोन्ही पैकी कोणत्याही मध्यमातूण आपण अर्ज करू शकतात.

मदतीसाठी संपर्क

  • पंचायत समिती कार्यालय
  • जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय
  • टोल फ्री हेल्पलाईन: 1962
  • तांत्रिक अडचणींसाठी: 8308584478

या योजनेचे फायदे

  • शेतीपूरक व्यवसायाची उत्तम सुरुवात
  • महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी
  • स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी
  • घरबसल्या उत्पन्नात वाढ

निष्कर्ष

कोंबड्यांचे वाटप हे शासकीय अनुदानित स्वरूपात उपलब्ध आहे. पात्रतेची खात्री करून आजच ऑनलाइन अर्ज करा. ही योजना तुमचं आर्थिक भविष्य बदलू शकते. शेतकरी आणि शेतमजूर दोघे देखील हे अर्ज करू शकतात.

Leave a Comment