ipo approved by sebi : सेबी कडून या चार कंपन्याच्या आयपीओ ला मंजूरी.

ipo approved by sebi: भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीच्या काळातच सेबीने आणखी चार कंपन्यांना शेअर बाजारामध्ये नोंदणीसाठी मंजुरी दिलेली आहे. गुंतवणूकदारांसाठी ही एक महत्त्वाची बातमी सेबी कडून देण्यात आली आहे. सेबीने या चार कंपन्यांना मंजुरी दिली असल्यामुळे आता या कंपन्यांना भारतीय शेअर बाजारात आपले शेअर विकण्याची संधी मिळणार आहे. त्यासोबतच शेअर बाजारात निवेश करणाऱ्या ग्राहकांना देखील आता नवीन चार कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक करता येणार आहे.

ipo approved by sebi

आयपीएलच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. सेबी कडून चार कंपन्यांना मिळालेली मंजुरी ही फक्त गुंतवणूकदारासाठीच नव्हे तर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी देखील महत्वपूर्ण बातमी समजली जात आहे. सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने मंजूर केल्या या चार कंपन्या विविध क्षेत्रातील आहेत. या कंपन्यांचा व्यवसाय सुरू देखील वेगवेगळे आहे. सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने मंजूर केला या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांना आयपीओ च्या माध्यमातून गुंतवणूक करता येणार आहे. सेबीने आयपीएस साठी मंजुरी दिलेल्या या चार कंपन्या कोणत्या आहेत याची संपूर्ण माहिती घेऊया.

1. अजय पॉल लिमिटेड (Ajay Poly Limited)

ipo approved by sebi अजय पॉल लिमिटेड ही कंपनी दिल्लीमध्ये स्थित आहे. ही कंपनी रेफ्रिजरेटर आणि सिलिंग सोल्युशन बनवते. म्हणजेच थंड करण्यासाठी यंत्रामध्ये वापरले जाणारे उपकरणे या कंपनीच्या माध्यमातून बनवले जातात. रेफ्रिजरेटर साठी लागणारी उपकरणे बनवण्यासाठी ही कंपनी अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी करत आहे. या कंपनीच्या माध्यमातून आपली उत्पादने संपूर्ण देशभर विकली जात आहेत. आता सेबीकडून या कंपनीला आयपीओ साठी मंजुरी मिळाली आहे. आयपीएलच माध्यमातून निधी उपलब्ध करून कंपनी आपल्या व्यवसायामध्ये अधिक वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही कंपनी डिसीजे समूहाची प्रमुख कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1991 मध्ये करण्यात आलेली आहे. भारतातील प्रमुख उत्पादकापैकी एक म्हणून या कंपनीची ओळख निर्माण आहे.

2. रिगल रिसोर्सेस (regal resources limited)

ipo approved by sebi रीगल रिसोर्सेस ही कंपनी कोलकत्ता या ठिकाणी स्थापित आहे. ही कंपनी मका पासून तयार केलेल्या उत्पादनांची विक्री करते. ज्यामध्ये नाश्त्याचे पदार्थ अन्नाच्या संबंधित विविध वस्तू अशा उत्पादनामध्ये ही काम करते. भारतीय बाजारामध्ये दिवसेंदिवस FMCG क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांनी लक्ष वेधलेले आहे.

3. लक्ष्मी इंडिया फायनान्स (laxmi India finance limited)

लक्ष्मी इंडिया फायनान्स ही कंपनी जयपूर येथे स्थित आहे. ही एक नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे. ही कंपनी नागरिकांना कर्ज आणि आर्थिक आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवण्याचे काम करते. लक्ष्मी इंडिया फायनस कंपनी प्रामुख्याने ग्रामीण व निमशहरी भागामध्ये अधिक लक्ष केंद्रित करते. या कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक असणारे कर्ज आणि बँकिंग सुविधा पुरवण्याचे काम पूर्ण केले जात आहे. या कंपनीला देखील आयपीएस च्या माध्यमातून निधी जमा करून आपल्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याचा उद्देश ठेवलेला आहे.

4.जाजू रश्मी रिफॅक्टरीज ( jajoo rashmi refractories limited)

जाजू रश्मी रीफॅक्टरीज ही कंपनी जयपुर मध्ये स्थित आहे. ही कंपनी स्टील बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती करते. या कंपनीच्या माध्यमातून फेरोसिलोकन फेरो मॅग्नीज यासारख्या धातूंमध्ये वापरले जाणारे पदार्थ तयार केले जातात. दिवसेंदिवस स्टील क्षेत्राच्य उद्योगांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या मागणीमुळे या कंपनीच्या उत्पादनाची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आयपीओ च्या IPO माध्यमातून निधी उपलब्ध करून ही कंपनी अधिक मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे.

गुंतवणूकदारांसाठी संधी

भारतीय शेयर बाजारात या चार कंपन्यांचे IPO पुढील काही आठवड्यांमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जो कोणी शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असेल त्यांच्यासाठी ही एक अतिशय चांगली संधी असू शकते. मात्र कोणत्याही IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीची माहिती, त्यांचा व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि भविष्यातील वाढीच्या शक्यतांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आपण त्या बद्दल अधिक माहिती घेऊनच गुंतवणूक करावी.

Leave a Comment