hsc result 2025 : बारावीचा निकाल जाहीर! निकालात कोणी मारली बाजी..!

hsc result 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल दिनांक 5 मे 2019 रोजी जाहीर केला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना तसेच पालकांना दुपारी एक वर्षापासून पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. शिक्षण मंडळांनी निर्गमित केलेल्या आणि निर्धारित केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या प्रसिद्ध झालेले निकालाच्या माध्यमातून राज्यातील शैक्षणिक स्थिती आणि आकडेवारी समोर आली आहे. कोणते विभाग अधिक प्रभावशाली ठरले आहेत याची माहिती घेऊ.

निकाल कसा पाहता येईल

निकाल पाहण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण आपला निकाल पाहू शकता. अधिकृत संकेतस्थळांची लिंक साठी येथे क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या संकेतस्थळावर गेल्यानंतर विद्यार्थी आपला रोल नंबर आणि आपल्या आईचे नाव टाकून आपला निकाल पाहू शकतात. निकाल समोर आल्यानंतर आपण त्या निकालाची प्रिंट देखील किंवा पीडीएफ देखील डाऊनलोड करून घेऊ शकता.

हे पण वाचा:
hakka sod patra hakka sod patra : हक्क सोड प्रमाणपत्र म्हणजे काय?

hsc result 2025 शाखा नुसार निकाल

बारावी साठी विज्ञान वाणिज्य कला आणि व्यावसायिक अशा चार शाखा अभ्यासक्रमाच्या उपलब्ध आहेत. या चारी शाखांचा निकाल पाच मे रोजी जाहीर झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त निकाल हा विज्ञान शाखेने प्राप्त केला आहे.

  • विज्ञान शाखा 97.35% निकाल
  • वाणिज्य शाखा 92.38% निकाल
  • कला शाखा 80.52% निकाल
  • व्यावसायिक शाखा 83.26% निकाल

विभागानुसार टक्केवारी

शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक प्रसिद्ध आलेला लातूर विभाग आता निकालात घसरला आहे. विभागानुसार कोकण विभाग निकालामध्ये सर्वाधिक आहे तर लातूर विभाग निकालामध्ये सर्वात कमी आहे. राज्यातील विभागानुसार विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाची टक्केवारी खालील प्रमाणे:- hsc result 2025

  • कोकण 96.94%
  • कोल्हापूर 93.64%
  • मुंबई 92.93%
  • छत्रपती संभाजी नगर 92.24%
  • अमरावती 91.43%
  • पुणे 91.32%
  • नाशिक 91.31%
  • नागपूर 90.52%
  • लातूर 89.46%

मुलींचा निकाल अधिकच hsc result 2025

2025 मधील बारावी परीक्षेसाठी एकूण 14 लाख 27 हजार 85 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. या 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थ्यापैकी १३ लाख २८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालामध्ये एक लाख पेक्षा अधिक विद्यार्थी नापास झालेले पाहायला मिळाले आहे. मागील वर्षापेक्षा निकालाची स्थिती देखील यावर्षी कमी पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 93.37% होती. तर 2025 मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 91.88% झाली आहे. निकालामध्ये मागील वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील मुलींनीच बाजी मारली आहे.

हे पण वाचा:
sucess story sucess story : पुरुषोत्तम कोकरे यांची ‘उपजिल्हाधिकारी’ पदावर निवड
  • मुलींची यश मिळवण्याची टक्केवारी :- 94.58%
  • मुलांनी यश मिळवल्याची टक्केवारी :- 89.51%

विद्यार्थी निकाल आकडेवारी

  • 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी :- 8352
  • 85 ते 90 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थी :- 22317
  • 80 ते 85 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थी :- 46336
  • 75 ते 80 टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी:- 74172
  • 70 ते 75 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थी :- 103070
  • 65 ते 70 टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी :- 131812
  • 60 ते 65 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थी :- 181755
  • 45 ते 60 टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी:- 600224

hsc result 2025

Leave a Comment