gharkul yojana तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत घरकुल योजनेसाठी अर्ज केला आहे, पण अजूनही तुमचं नाव लाभार्थी यादीत नाही? तर सावधान! कारण सरकारने काही अपात्रतेचे नवे निकष जाहीर केले आहेत, जे पूर्ण न केल्यास तुमचा अर्ज थेट बाद होऊ शकतो.
या लेखामध्ये आपण पाहणार आहोत, कोणकोणत्या 10 कारणांमुळे घरकुल योजनेतून अर्जदार अपात्र ठरतो, आणि सरकारने नुकतेच सुधारित केलेले नियम काय आहेत.

योजना मंजुरीत मोठा बदल – 2 कोटी नवीन घरांची घोषणा
9 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 2024-25 ते 2028-29 या कालावधीत 2 कोटी नवीन ग्रामीण घरकुलांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच, अपात्रतेचे जुने निकष देखील परत पाहण्यात आले आणि काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
आता ‘ही’ साधने अपात्रतेत धरली जाणार नाहीत
पूर्वीच्या निकषांनुसार, ज्या व्यक्तीकडे खालील गोष्टी होत्या त्या अपात्र ठरत होत्या. पण आता या अटी काढून टाकण्यात आल्या आहेत:
- यांत्रिक दुचाकी (बाईक/मोटरसायकल)
- लँडलाइन फोन
- रेफ्रिजरेटर (फ्रीज)
- यांत्रिक मासेमारी बोट
म्हणजेच, आता या साधनांचा मालक असाल तरी तुमचा अर्ज बाद होणार नाही.
gharkul yojana उत्पन्नाची मर्यादा वाढवली
पूर्वी घरकुल योजनेसाठी पात्रतेसाठी मासिक उत्पन्नाची मर्यादा ₹10,000 होती. आता ती वाढवून ₹15,000 प्रतिमाह करण्यात आली आहे.
याचा अर्थ, वार्षिक उत्पन्न ₹1.80 लाखांपर्यंत असलेल्या कुटुंबांनी अर्ज केल्यास ते पात्र ठरू शकतात.
पण जर तुमचं वार्षिक उत्पन्न ₹1.80 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही अपात्र ठरू शकता.
घरकुलसाठी ‘पायरी-आधारित’ पात्रता प्रक्रिया
योजनेत आता दोन पायऱ्यांतील तपासणी प्रणाली लागू करण्यात आली आहे:
पायरी 1:
पक्क्या छप्पराचे किंवा पक्क्या भिंतीचे घर असल्यास. दोन किंवा अधिक खोल्या असलेल्या घरात राहात असल्यास.या स्थितीत अर्जदाराला प्राथमिक टप्प्यातच अपात्र ठरवलं जातं.
पायरी 2:
पायरी 1 पार झाल्यानंतर अर्जदाराची माहिती खालील 10 अपात्रतेच्या कारणांवर आधारित तपासली जाते.
‘ही’ 10 कारणं ठरवतील तुमचा अर्ज अपात्र आहे की पात्र
- मोटार चालित 3 किंवा 4 चाकी वाहन तुमच्याकडे कार, जीप, ट्रक इत्यादी वाहन असल्यास तुम्ही अपात्र ठरू शकता.
- 3 किंवा 4 चाकी यांत्रिक शेती उपकरणं ट्रॅक्टर, पावर टिलर इत्यादी आधुनिक शेती यंत्रं असल्यास तुमचा अर्ज बाद होऊ शकतो.
- ₹50,000 पेक्षा जास्त मर्यादेचं क्रेडिट कार्ड / KCC तुमच्याकडे जर Kisan Credit Card (KCC) आहे आणि त्याची मर्यादा ₹50,000 पेक्षा जास्त असेल, तर योजनेसाठी तुम्ही अपात्र ठरू शकता.
- घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी कर्मचारी कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
- नोंदणीकृत बिगर-कृषी उद्योग तुमचं स्वतःचं बिझनेस जर सरकारकडे नोंदणीकृत असेल (उदा. दुकान, वर्कशॉप, युनिट), तर योजनेसाठी अपात्रता ठरते.
- मासिक उत्पन्न ₹15,000 पेक्षा अधिक कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं मासिक उत्पन्न जर ₹15,000 पेक्षा जास्त असेल, तर अर्ज बाद होऊ शकतो.
- आयकर भरणे कुटुंबातील कोणीही व्यक्ती Income Tax भरत असल्यास, घरकुलचा लाभ मिळणार नाही.
- व्यवसायिक कर भरणे व्यवसायिक कर भरत असल्यास, म्हणजेच तुम्ही नोंदणीकृत व्यापारी असाल, तरीही अर्ज बाद होतो.
- अडीच एकरांपेक्षा जास्त बागायती जमीन जर फार्मर आयडीवर अडीच एकरांपेक्षा जास्त बागायती जमीन नोंद झाली असेल, तर अर्ज आपोआप रिजेक्ट होतो.
- 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त कोरडवाहू जमीन जरी जमीन कोरडवाहू असली तरी ती जर 5 एकरांपेक्षा जास्त असेल, तरीही अर्ज बाद होतो.
अर्ज नाकारण्याची प्रक्रिया ‘ऑटोमेटेड’
हे सर्व निकष ऑनलाईन सिस्टीमद्वारेच तपासले जातात. त्यामुळे तुम्ही काहीच चुकीचं केलं नसलं, तरी सिस्टमने जर माहिती जुळवली आणि निकषांशी विसंगतता सापडली, तर तुमचा अर्ज आपोआप बाद होतो.
तुम्ही अपात्रतेत बसत नाही? मग योजनेचा लाभ मिळू शकतो!
वरील कोणत्याही कारणांमध्ये तुम्ही बसत नसाल, तर तुमचा अर्ज पात्रतेसाठी पुढे पाठवला जातो आणि तुम्ही योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरू शकता.
✅ त्यासाठी तुमचं उत्पन्न, जमीन, सरकारी नोकर्या यासारख्या गोष्टींची सत्य माहिती द्या
✅ कोणतीही माहिती लपवू नका, कारण ती डिजिटल स्वरूपात पडताळली जाते
✅ अर्जाच्या स्थितीबाबत ग्रामसेवक/सरपंच यांच्याशी संपर्क ठेवा
निष्कर्ष
घरकुल योजनेचा लाभ मिळवायचा असेल, तर अपात्रतेच्या अटी लक्षात घेऊनच अर्ज करणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होईलच आणि पुढे कोणत्याही योजनांसाठीही अडथळा निर्माण होऊ शकतो. तुमचं नाव यादीत येण्यासाठी या लेखातील प्रत्येक मुद्दा नीट समजून घ्या आणि इतर लाभार्थींनाही शेअर करा.