gharkul survey: देशातील गरीब व गरजू व्यक्तींना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने देशांमध्ये पीएम आवास योजना सुरू केली. पीएम आवास योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली. 2016 मध्ये पीएम आवास योजनेचा टप्पा एक पूर्ण करण्यात आला. त्यानंतर आता देशातील गरजू व पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी देशांमध्ये पीएम आवास योजना टप्पा 2 राबवण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.

घरकुल योजनेसाठी नाव नोंदणी महत्त्वाची
gharkul survey पीएम आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी घरकुल योजनेसाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांची नावे प्रपत्र ड यादीमध्ये समाविष्ट असतील अशाच लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल. विविध पात्रता अटीनुसार या लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना प्राधान्य क्रमानुसार घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल. घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रपत्र ड यादीमध्ये नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रपत्र ड मध्ये नाव नोंदणी करण्यासाठी शासनाने पीएम आवास सर्वेक्षण ही मोहीम हाती घेतली आहे. पीएम आवास सर्वेक्षण चे अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची नावे प्रपत्र ड यादीमध्ये समाविष्ट केले जातील.
घरकुल सर्वेक्षण कसे करावे
प्रपत्र ड यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी लाभार्थ्यांना आपले सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणाच्या अंतर्गत लाभार्थ्याचे पात्रता तपासणी केली जाईल. लाभार्थी पात्र असल्यास लाभार्थ्याचे नाव प्रपत्र ड यादीमध्ये समाविष्ट केली जाईल. या प्रपत्र या त्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी लाभार्थ्यांना सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.
gharkul survey सर्वेक्षण करण्यासाठी लाभार्थी स्वतः आपल्या मोबाईलच्या माध्यमातून देखील घरकुल सर्वेक्षण करू शकतो. किंवा आपल्या ग्रामपंचायतला नेमलेल्या असिस्टंट यांच्या माध्यमातून देखील आपला घरकुल सर्वे पूर्ण करू शकतो. या दोन्ही पद्धतीने आपण आपला घरकुल सर्वे पूर्ण करू शकता. घरकुल सर्वे करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये आवाज प्लस 2024 आणि आधार फेस आरडी हे दोन ॲप इंस्टॉल असणे आवश्यक आहे. या दोन्ही ॲपच्या माध्यमातून आपण आपले घरकुल सर्वेक्षण पूर्ण करू शकता.
अर्ज करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस
सर्वेक्षण करण्यासाठी लाभार्थ्यांना 30 एप्रिल 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. 30 एप्रिल 2025 पूर्वी लाभार्थी घरकुल सर्वेक्षण पूर्ण करतील त्यास लाभार्थ्यांचे नाव प्रपत्र ड यादीमध्ये समाविष्ट केले जाईल. त्यामुळे आतापर्यंत ज्या नागरिकांनी घरकुल सर्वेक्षण पूर्ण केले नसेल त्यांनी येत्या दोन दिवसांमध्ये आपले सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे.
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळेल का gharkul survey
gharkul survey पीएम आवास सर्वेक्षण करण्यासाठी सध्या तरी तीस एप्रिल 2025 अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. यामध्ये गुतवाड मिळेल किंवा नाही याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही. याबाबत शासनाकडून मतवाड देण्याबाबत कोणतीही घोषणा व परिपत्रक जारी करण्यात आलेले नाही. जर शासनाकडून याबद्दल काही अपडेट आलेच तर आपल्याला नक्कीच कळवले जाईल.
परंतु सद्यस्थितीमध्ये तरी 30 एप्रिल 2025 हीच सर्वेक्षणासाठी अंतिम तारीख आहे. त्यामुळे पात्र असणाऱ्या नागरिकांनी अद्याप पर्यंत आपले सर्वेक्षण पूर्ण केले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपले सर्वेक्षण करून घ्यावे. सर्वेक्षण करण्याबाबतची सर्व प्रक्रिया खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. हे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन आपण आपले घरकुल सर्वेक्षण पूर्ण करू शकता.