gazette maharashtra :गॅझेट म्हणजे भारत सरकारकडून प्रसिद्ध होणारा अधिकृत कायदेशीर दस्तऐवज असून, नाव, जन्मतारीख किंवा इतर वैयक्तिक माहितीमध्ये बदल करण्यासाठी याचा उपयोग होतो. गॅझेट साठी फोटो, आधार कार्ड, पत्ता पुरावा, जन्मतारीखचा पुरावा, जुने व नवीन नाव, मोबाइल नंबर आणि मॅरेज सर्टिफिकेट किंवा प्रतिज्ञापत्र अशी काही आवश्यक कागदपत्रे लागतात. गॅझेटच्या माध्यमातून नावात फरक असले तरी दोन्ही नावांचा वापर करता येतो, स्त्रियांसाठी विवाहानंतरचा नावबदल सहज शक्य होतो आणि सरकारी व खासगी कामांसाठी अधिकृत ओळख तयार होते. हे अर्ज आपले सरकार महा ऑनलाइन पोर्टलवरून घरबसल्या करता येतात.

गॅझेट म्हणजे काय?
गॅझेट म्हणजे काय म्हणजे भारत सरकारचा एक अधिकृत दस्तऐवज, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने आपले नाव, जन्मतारीख, धर्म यासारखी वैयक्तिक माहिती बदलल्याचा जाहीर उल्लेख केला जातो. हा जाहीरनामा ‘गॅझेट ऑफ इंडिया’ मध्ये छापला जातो आणि त्याचा उपयोग नवे नाव किंवा इतर बदल कायदेशीररित्या सिद्ध करण्यासाठी होतो.
गॅझेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
गॅझेट साठी खूप जास्त कागदपत्रे लागत नाहीत. खाली दिलेल्या यादीत प्रत्येक क्रमांकातून फक्त एकच कागदपत्र लागेल:
- तुमचा एक पासपोर्ट साईझ फोटो
- ओळख पत्र:
- आधार कार्ड /
- पॅन कार्ड /
- इलेक्शन कार्ड /
- पासपोर्ट (यापैकी एक)
- पत्ता सिद्ध करणारे डॉक्युमेंट (जर आधार कार्डवर पत्ता बरोबर नसेल तर):
- राशन कार्ड /
- लाईट बिल
- जन्म दाखला / शाळेचा दाखला / बोनाफाईड सर्टिफिकेट
- जुने नाव आणि नवीन नाव
- मोबाईल नंबर
- मॅरेज सर्टिफिकेट किंवा 100 रुपयांच्या स्टॅंपवर प्रतिज्ञापत्र (Affidavit)
गॅझेटसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया gazette maharashtra
गॅझेट काढण्यासाठी आपण घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता. ही प्रक्रिया अगदी सोपी असून खाली प्रत्येक टप्पा दिला आहे:
१. पोर्टल ओपन करा
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर आपले सरकार महा ऑनलाइन पोर्टल उघडा.
२. नवीन युजर असल्यास रजिस्ट्रेशन करा
- जर तुमचं याआधी अकाउंट नसेल तर “New User? Register Here” या लिंकवर क्लिक करा.
- दोन प्रकारे रजिस्ट्रेशन करता येते:
- फक्त मोबाईल नंबर वापरून
- मोबाईल नंबर, ओळखपत्र व पत्ता पुरावा अपलोड करून (हे जास्त सुरक्षित)
३. लॉगिन करा
- युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- “Your District” पर्यायात तुमचा जिल्हा निवडा.
४. विभाग निवडा
- लॉगिन केल्यावर डाव्या बाजूला अनेक विभाग दिसतील.
- त्यातून Industries, Energy and Labour Department निवडा.
- त्यानंतर Directorate of Government Printing and Stationery हा विभाग निवडा.
५. अर्जाचा प्रकार निवडा
- नाव बदलायचं असल्यास “Change in Name” हा पर्याय निवडा आणि “Proceed” करा.
६. अर्जाची भाषा निवडा आणि फॉर्म भरा
- इंग्रजी किंवा मराठी भाषा निवडा.
- दिलेल्या सूचनांनुसार अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट काढा.
- फॉर्ममध्ये जुनं नाव, नवीन नाव, कारण (उदा. लग्नानंतर नाव बदल) आणि सही भरावी.
७. अर्ज माहिती ऑनलाईन भरणे
- फॉर्म भरल्यानंतर पोर्टलवर पुन्हा लॉगिन करून अर्जात खालील माहिती भरा:
- जुने व नवीन नाव
- जन्मतारीख, वय, लिंग, संपूर्ण पत्ता
- मोबाईल नंबर, ईमेल, आधार क्रमांक
- नाव बदलण्याचं कारण
८. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळखपत्र (आधार, पॅन, इलेक्शन कार्ड यापैकी एक)
- पत्ता पुरावा (राशन कार्ड, लाईट बिल इत्यादी)
- जन्म दाखला किंवा बोनाफाईट
- मॅरेज सर्टिफिकेट किंवा प्रतिज्ञापत्र (ज्यामुळे नाव बदल होतंय ते कारण)
टीप: कागदपत्र JPG किंवा PDF फॉरमॅटमध्ये असावेत.
९. अर्जाची फी भरा
- Open Category – ₹523
- Backward Category – ₹233
- पेमेंट डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगने करता येते.
१०. अर्ज सबमिट करा आणि प्रतीक्षा करा
- सर्व माहिती व कागदपत्र तपासून अर्ज सबमिट करा.
- 3 ते 4 दिवसांत अर्ज मंजूर होतो.
११. गॅझेट डाउनलोड करा gazette maharashtra
- अर्ज मंजूर झाल्यावर पोर्टलवर लॉगिन करून “Gazette Status” मध्ये तुमचा अर्ज क्रमांक टाका.
- “View Gazette” वर क्लिक करून गॅझेटची PDF फाईल डाउनलोड करा व प्रिंट काढा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला मिळालेला गॅझेट दस्तऐवज हा कायदेशीरपणे मान्य असतो आणि सर्व सरकारी व खासगी कामांसाठी वापरता येतो.
गॅझेट बनवण्याचे फायदे
1. नावात फरक असले तरी चालतो
कधी कधी एखाद्या व्यक्तीचे दोन नावं असतात – एक जुने आणि एक नवीन. उदा. आधार कार्डवर एक नाव आणि मार्कशीटवर दुसरे नाव. अशावेळी गॅझेट काढल्यास दोन्ही नावे कायदेशीर मानली जातात.
2. लग्नानंतर स्त्रियांचे नाव बदल
काही धर्मात विवाहानंतर स्त्रियांचे नाव बदलले जाते. अशा स्त्रियांच्या सर्व कागदपत्रांमध्ये नावात फरक असतो. गॅझेट घेतल्यावर त्या दोन्ही नावे वापरू शकतात, जे नोकरी किंवा सरकारी कामात उपयोगी पडते.
3. मुस्लिम बांधवांचे नाव संक्षेपात असणे
अब्दुल करीम हे नाव कधी “अ.करीम” असे लिहिलेले असते. गॅझेट केल्यास दोन्ही नावे एकच व्यक्तीची आहेत हे स्पष्ट करता येते.
4. कागदपत्रांमध्ये नाव वेगवेगळं असणं
जर तुमच्या काही कागदपत्रांमध्ये एक नाव आणि काहीत एक वेगळं नाव असेल, तर गॅझेट करून योग्य नाव काय आहे हे अधिकृतरित्या सिद्ध करता येते.
5. चुकीची जन्मतारीख दुरुस्त करता येते
कधी कधी शाळेच्या प्रमाणपत्रात चुकीची जन्मतारीख असते. गॅझेट काढून खरी जन्मतारीख काय आहे हे सांगता येते.
गॅझेट म्हणजे कायदेशीर ताकद
gazette maharashtra गॅझेट हे सरकारी कागदपत्र असल्याने त्याचा उपयोग पुढील सर्व कागदपत्रे अपडेट करताना होतो –
उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खातं, शाळेची माहिती, सरकारी नोकरीचे अर्ज इत्यादी.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. गॅझेट म्हणजे काय?
गॅझेट म्हणजे भारत सरकारकडून प्रसिद्ध होणारा अधिकृत कायदेशीर दस्तऐवज, ज्याचा उपयोग नाव, जन्मतारीख, धर्म किंवा इतर वैयक्तिक माहितीतील बदल अधिकृतपणे सिद्ध करण्यासाठी होतो.
2. गॅझेट काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळखपत्र (आधार/पॅन/इलेक्शन कार्ड/पासपोर्ट – यापैकी एक)
- पत्ता पुरावा (राशन कार्ड/लाईट बिल)
- जन्मतारीख पुरावा
- मॅरेज सर्टिफिकेट किंवा प्रतिज्ञापत्र
3. गॅझेट अर्ज कुठे आणि कसा करायचा?
“आपले सरकार महा ऑनलाइन पोर्टल” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो.
4. अर्ज मंजूर होण्यास किती वेळ लागतो?
सर्व माहिती आणि कागदपत्रं योग्य दिल्यास, ३ ते ४ दिवसांत अर्ज मंजूर होतो.
5. गॅझेट कुठे वापरता येतो?
गॅझेटचा उपयोग आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक, शाळा, नोकरी अर्ज, पासपोर्ट अशा सर्व ठिकाणी नाव किंवा इतर बदल अधिकृतपणे दाखवण्यासाठी केला जातो.
निष्कर्ष gazette maharashtra
gazette maharashtra जर तुमचं नाव, जन्मतारीख किंवा इतर माहिती चुकीची असेल किंवा बदल करायचा असेल, तर गॅझेट हे सर्वात सोपं आणि अधिकृत माध्यम आहे. घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून तुम्ही तुमचं नाव कायदेशीररित्या बदलू शकता.