FYJC Admission 2025: 11वीच्या प्रवेशासाठी अशी करा ऑनलाइन नोंदणी.

FYJC Admission 2025 साली इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता FYJC म्हणजेच 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. यंदा पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रात केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रथम “नोंदणी” करणे गरजेचे आहे

FYJC Admission 2025 नोंदणी कधी करायची?

Actual Registration: 21 मे 2025 पासून सुरू
19 आणि 20 मे हे दिवस केवळ रजिस्ट्रेशनची चाचणी (Demo) साठी ठेवण्यात आले आहेत. हे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर त्यातील सर्व माहिती 20 तारखेनंतर डिलीट केली जाईल. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी 21 मेपासून नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल.

FYJC Registration करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या mahafyjcadmission.org या संकेतस्थळावर जाऊन “Registration” लिंकवर क्लिक करा.
2. तुमचं शिक्षण कुठून झालं ते निवडा Within Maharashtra: जर तुम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थी असाल Outside Maharashtra: जर तुमचं शिक्षण कर्नाटक, गुजरात किंवा इतर राज्यातून झालं असेल
3. तुमचा स्टेटस निवडा Fresher: जर तुम्ही 2025 मध्ये 10 वी दिली असेल Repeater: जर तुम्ही याआधी 10वी दिली असेल
4. बोर्ड प्रकार निवडा SSC, CBSE, ICSE, NIOS किंवा इतर बोर्ड निवडून सीट नंबर व आईचं नाव टाका.
5. माहिती तपासा तुमचं नाव, आईचं नाव, परीक्षा वर्ष – ही माहिती ऑटोमॅटिक भरली जाईल. ती नीट तपासून ‘Yes, Correct’ वर क्लिक करा.

खाते तयार करताना काय माहिती लागते?

Email ID आणि मोबाईल नंबरसिक्युरिटी प्रश्न आणि उत्तर (जसे: तुमचा फेवरेट मूव्ही, बेस्ट फ्रेंडचं नाव)

FYJC Admission 2025 पासवर्ड तयार करताना:
एक Capital letter (उदा. A, B, C) एक Small letter (उदा. a, b, c) एक नंबर (उदा. 1, 2, 3) या प्रमाणे तयार करावा उदा – Pass@123

Login कसा करायचा?

नोंदणी केल्यानंतर तुम्हाला Application ID आणि Password मिळेल. हे वापरून तुम्ही लॉगिन करू शकता. पुढील पृष्ठावर तुमचं नाव, युजर आयडी, माहिती दिसेल.

Personal Details कशी भरायची?

  • नाव, आईचं नाव, जन्मतारीख, शाळेचं नाव, स्कूल कोड – सर्व माहिती भरावी
  • पत्ता, जिल्हा, तालुका, पिनकोड, मोबाईल नंबर
  • नंतर “Save and Next” वर क्लिक करा

कास्ट आणि रिझर्वेशन माहिती

तुमची जात निवडा – SC, ST, OBC, NT इ. कास्ट सर्टिफिकेट आहे का हे विचारलं जाईल जर ओपन कॅटेगरी असेल, तर ईडब्ल्यूएससाठी 10% आरक्षणाचा पर्याय दिला जाईल

FYJC Admission 2025 इतर माहिती भरताना…

एक्स-सर्विसमॅन, स्पोर्ट्स, ऑर्फन, मायनॉरिटी, इनहाऊस कोटा यासारखे पर्याय तपासून भरावेत दहावीचे विषय, गुण, टक्केवारी ही माहिती ऑटोमॅटिक भरण्यात येईल

FYJC Admission 2025 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन

  • जवळचं गाईडन्स सेंटर निवडावं
  • खालील कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल:
    दहावीची मार्कशीट
    स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेट (LC)
    कास्ट सर्टिफिकेट (जर लागू होत असेल)
    नॉन-क्रिमिलेअर सर्टिफिकेट (OBC/NT साठी आवश्यक)

फी भरणे

  • नोंदणीसाठी ₹100 इतकी फी आहे
  • ऑनलाइन पेमेंट यंत्रणेद्वारे फी भरली जाते
  • पेमेंट केल्यानंतर तुम्हाला Transaction ID आणि Receipt मिळते

पुढील टप्पा: Part-2 आणि कॉलेज निवड

Part-2 मध्ये कॉलेज निवड (Option Form) भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया 21 मेनंतर सुरू होणार आहे. याबाबतचा स्वतंत्र मार्गदर्शक लवकरच उपलब्ध होईल

निष्कर्ष

सर्व विद्यार्थ्यांनी FYJC प्रवेशासाठी वेळेत आणि अचूक माहिती भरून नोंदणी करावी. ही प्रक्रिया एकदाच होते, त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि फॉर्म भरताना गडबड टाळा.

महत्त्वाची टीप:
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी 21 मेपासून प्रत्यक्ष नोंदणी करताना ही माहिती वाचून ठेवा. कोणतीही चूक टाळण्यासाठी आधी प्रॅक्टिस (Demo) नोंदणी करून ठेवणं फायदेशीर ठरेल.

Leave a Comment