dream 11 winner: शेतकऱ्याचा मुलगा झाला करोडपती. जिंकले एक कोटी रुपये.

dream 11 winner सध्या आयपीएल 2025 सुरू आहे क्रिकेटचा छंद असणाऱ्या व्यक्तीसोबतच आता करोडपती होणारे नागरिक सुद्धा आयपीएलचा छंद जोपासत आहे. सध्या ड्रीम ११ आणि माय ११ यासारख्या ॲपच्या माध्यमातून अनेक नागरिकांना ipl ची टीम बनवण्याचा मोठा छंद लागला आहे. टीम बनवा आणि बक्षीस जिंका या पद्धतीची जाहिरात सर्वच भारतीय खेळाडू करताना आपल्याला निदर्शनात येत आहेत. मुळात हा एक जुगारच आहे परंतु या जुगाराला व्हाईट कॉलर जोडण्यात आल्यामुळे हा खेळ सर्रासपणे सुरू असताना दिसत आहे.

dream 11 winner

शासनाला अशा ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जमा होतो यामुळे शासन देखील अशा गोष्टींना खुलेआम परवानगी देताना दिसत आहे. याच प्रकारात एका शेतकऱ्याच्या मुलांनी एक कोटी रुपये जिंकले आहेत. याची संपूर्ण देशभर देखील चर्चा सुरू आहे. एक कोटी जिंकणे म्हणजे नशीबच अशा भावनेत असणाऱ्या नागरिकांना आणखी अशा गोष्टीकडे आकर्षित केले जात आहे.dream 11 winner

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा: खासदाराची झाली पगारवाढ

कोणी जिंकले १ कोटी dream 11 winner

देशातील सर्वच भागातील तरुण या खेळाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात. यातच छत्तीसगडच्या जशी पूर जिल्ह्यातील पत्थलगाव मधील एका शेतकरी पुत्राने एक कोटी रुपये जिंकले आहेत. जगन्नाथ सिदार असे या तरुणाचे नाव आहे. त्याने ड्रीम 11 वर एक कोटी रुपये जिंकले आहेत. ही जिंकली रक्कम त्याने आयपीएल मधील सामन्यात जिंकली नसून न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान झालेला 23 मार्च रोजी चा सामना या सामन्यामध्ये त्याने ही रक्कम जिंकली आहे. ड्रीम इलेव्हन वर त्याला एकूण ११३८ पॉईंट मिळाले या ११३८ पॉईंटवर त्याने पहिला क्रमांक पटकावला.

dream 11 winner त्याने जिंकलेली रक्कम हळूहळू त्याच्या बँक खात्यावर जमा होत आहे. त्याने सुरुवातीला सात लाख रुपये एवढी रक्कम आपल्या बँक खात्यावर ट्रान्सफर केली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र असणारा हा लाभार्थी अचानक करोडपती झाला आहे.

जगन्नाथ ने जिंकलेल्या या पैशामुळे आता सर्वसामान्य नागरिक देखील याकडे अधिक वळताना दिसत आहेत. ही रक्कम मिळवणे प्रत्येक जणाला शक्य नसते. त्यामुळे या भागातील तसेच पंचक्रोशीतील अनेक तरुण आपणही एक दिवस करोडपती होऊ या अपेक्षा पोटी आपले पैसे बरबाद करताना दिसून येतील.

हा एक प्रकारचा जुगारच

अचानक करोडपती होणे किंवा चाळीस-पन्नास रुपये लावून एक करोड रुपयांचं स्वप्न पाहणे हा एक जुगारच मानायला हरकत नाही. कोट्यावधी लोक यामध्ये हरतात त्यावेळी कुठेतरी एक जणाला या ठिकाणी यश मिळतं. परंतु या यशा मागं अनेक व्यक्तींनी आपले पैसे गमावलेले असतात. या भावनेतून हा एक जुगारच या पद्धतीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला जातो. कोट्यावधी तरुणांकडून पैसा जमा करायचा आणि कोणाला तरी एक जणाला करोडपती करायचं हाच उद्देश अशा माध्यमातून साधला जातो. सरकार या प्रकारावर 30% टॅक्स आकरतं त्यामुळे सरकार देखील अशा घटनांना प्रतिबंध घालताना दिसत नाही. आजारी शेतकरी मुलगा आज करोडपती झाला असेल तरीदेखील या तरुणाप्रमाणे अनेक तरुणांचे नशीब लागेलच असे सांगता येत नाही.

या खेळाची अशी असते पद्धत

dream 11 winner ड्रीम ११ असो अथवा माय ११ दोन्हीकडेही सारखीच पद्धत वापरली जाते. यामध्ये अनेक नागरिक आपली टीम सादर करतात 49 रुपये प्रति टीम याप्रमाणे पैसा जमा केला जातो. ज्या टीम मध्ये असणारे खेळाडू सर्वाधिक पॉईंट देतील त्या टीम मालकाला एक नंबरचे बक्षीस म्हणजेच एक कोटी रुपये वितरित केले जातात.

यामध्ये सहभागी होणारे लोक देखील करोडो मध्ये असतात. उदाहरणार्थ एक कोटी लोकांनी आपले टीम तयार करून 49 रुपये भरल्यानंतर एकूण जमा होणारी रक्कम 49 कोटी रुपये जमा होते. त्यापैकी एक नंबर वाल्याला एक कोटी त्यानंतर दोन नंबर वाल्याला दहा लाख तीन नंबर आलेला पाच लाख चार नंबर ला तीन लाख या प्रमाणात रक्कम वितरित केली जाते. शासन या सर्व जिंकलेल्या रकमेवर 30 टक्के एवढे टॅक्स आकारते. ज्यामधून शासनाला प्रत्येक मॅचच्या वेळी 30% टॅक्स मिळतो. ॲप चालवणारे आपला हिस्सा काढून उर्वरित रक्कम बाकीच्या क्रमांकांना वितरित करतात. ज्या टीम अत्यंत कमी पॉईंट प्राप्त करतात त्या टीमला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रक्कम मिळत नाही.dream 11 winner

Leave a Comment