chagan bhujbal : छगन भुजबळांची अखेर मंत्रिमंडळात एंट्री! खात कोणत ?

chagan bhujbal मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची अखेर राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांचा समावेश करण्यात आला. यामुळे त्यांच्या नाराजीला पूर्णविराम मिळाला आहे.

मागील मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांना डावलण्यात आलं होतं. त्यावेळी “जिथं चैन नाही, तिथं राहायचं नाही” हा त्यांचा वक्तव्य विशेष गाजलं होतं. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती.

शपथविधीनंतर छगन भुजबळ chagan bhujbal म्हणाले, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांचे आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. गेल्या आठवड्यातच सगळं ठरलं होतं. शेवट चांगला, तर सगळंच चांगलं असतं.”

दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा दिला होता. भुजबळ यांना हेच खाते देण्यात येईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

राजकीय वर्तुळात, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी मतदारांना भुरळ घालण्यासाठी महायुतीने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे. याआधी धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातील ओबीसी चेहरा होते. आता त्यांच्याऐवजी chagan bhujbal भुजबळ हे प्रतिनिधित्व करणार आहेत.

chagan bhujbal भुजबळ यांनी सोमवारी रात्री त्यांच्या नाशिकमधील काही निवडक कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

chagan bhujbal

Leave a Comment