cotton seed : 2025 मधील चांगले कापूस बियाणे.

cotton seed मे महिन्याच्या सुरुवातीस महाराष्ट्रात कापसाची लागवड सुरू होते आणि विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते. या वर्षी काही शेतकरी लागवड कमी करताना दिसत असून योग्य वाण निवडणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे. कापूस बियाणे निवडताना शेताची जमीन, पाणी उपलब्धता, हवामान आणि उत्पादनाची गरज याचा विचार करणे आवश्यक आहे. हलक्या जमिनीत कमी दिवसांत येणाऱ्या, तर बागायती रानात जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करावी. एका बोंडाचं सरासरी वजन किमान 4 ते 6 ग्रॅम असावं, कारण लहान बोंड असलेल्या वाणांमध्ये उत्पादन कमी येते.

सध्या महाराष्ट्रात कापूस लागवडीसाठी तयारी सुरू झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागांमध्ये दरवर्षीप्रमाणे कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. मात्र यावर्षी काही ठिकाणी लागवडीचे क्षेत्र कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणती वाण निवडावी, यावर विशेष भर दिला जात आहे.

cotton seed वाण निवडताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत?

कापूस बियाणे निवड करताना जमीन, पाणी, हवामान आणि उपलब्ध संसाधन यांचा विचार करणं गरजेचं आहे. जर तुमचं क्षेत्र हलकं असेल, जिरायती पद्धती असेल, तर कमी दिवसांत येणाऱ्या जाती निवडाव्यात. जर बागायती जमीन असेल, तर जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचा विचार करावा.

  • हलक्या जमीनसाठी – कमी कालावधीची जात
  • मध्यम जमीनसाठी – मध्यम कालावधीची जात
  • बागायती जमीनसाठी – जास्त दिवसात येणारी, मोठ्या बोंडाची जात

टपोऱ्या बोंडांची वाण कशी ओळखावी?

एका बोंडाचं सरासरी वजन 4 ते 6 ग्रॅम दरम्यान असावं. जर बोंडाचं वजन 3 ग्रॅमच्या खाली असेल, तर अशा वाणांची निवड टाळावी. टपोऱ्या बोंडाची वाण फक्त उत्पन्नच नाही तर बाजारात दरही चांगला देतात.

सर्वाधिक मागणी असलेली वाण (शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित)

1. Rasi 659

  • बोंडाचं वजन साडे 6 ग्रॅमपर्यंत
  • बागायती क्षेत्रासाठी उपयुक्त
  • 14 ते 15 क्विंटल प्रति एकर उत्पन्न शक्य

2. US Grey Seeds 7067

  • मागील वर्षी सर्वाधिक मागणी
  • मध्यम आकाराचं बोंड
  • भुरकाट व मध्यम जमिनीमध्ये उपयुक्त
  • 5 ग्रॅमपर्यंत बोंडाचं वजन

3. Prabhat Supercot

  • जिरायती व हलक्या जमिनीमध्ये उत्तम
  • 8 ते 10 क्विंटलचे उत्पन्न सहज शक्य
  • सातत्याने 5 वर्षांपासून बाजारात

4. Rasi 779 (Rasi Seeds)

  • जमीन प्रकार: हलकी, मध्यम काळी, अर्धबागायती
  • बोंड: मध्यम आकाराचं, सरासरी वजन सुमारे 4.5 ते 5 ग्रॅम
  • उत्पन्न: योग्य नियोजन असल्यास 10 ते 13 क्विंटल प्रति एकर
  • विशेषता:
    • तीन-चार वेळा खत फवारणी केल्यास बोंडांची संख्या वाढते
    • या वाणाला कमी पाण्यातही चांगला प्रतिसाद मिळतो
    • शेतकरी अनुभव: परभणी भागात उत्कृष्ट प्लॉट पाहिला गेला
    • शिफारस: हलक्या रानात पण पाण्याचं थोडं नियोजन आवश्यक

5. Jay Ho (Shrikhar Seeds)

  • जमीन प्रकार: काळी कसदार बागायती जमीन
  • बोंड: अतिशय मोठं, टपोऱं; सरासरी वजन 6 ते 7 ग्रॅम
  • उत्पन्न: पाण्याचं योग्य नियोजन असेल तर 14 ते 16 क्विंटल प्रति एकर
  • विशेषता:
    • मोठ्या बोंडामुळे काढणीसाठी कमी वेळ लागतो
    • जाडपानं असल्यानं रसशोषक किडीचा धोका वाढतो, त्यामुळे नियमित फवारणी गरजेची
    • अर्ध पाण्यातही लावता येते, पण काळी जमीन असल्यास उत्पादन वाढतं
    • शिफारस: टपोऱ्या बोंडासाठी उत्तम पर्याय

6. Sanket (Naath Seeds)

  • जमीन प्रकार: पश्चिम महाराष्ट्रातील काळी, कसदार किंवा अर्ध हलकी जमीन
  • बोंड: मध्यम आकाराचं; सरासरी वजन 4.5 ते 5 ग्रॅम
  • उत्पन्न: नियोजनानुसार 9 ते 12 क्विंटल प्रति एकर
  • विशेषता:
    • बुलढाणा, अहमदनगर, पैठण परिसरात चांगला प्रतिसाद
    • शेतीच्या उंची प्रमाणात उंच झाडं वाढतात
    • 7067 वाणाशी तुलनात्मकदृष्ट्या समान बोंड उत्पादन
    • शिफारस: ज्या भागात आधी यशस्वी ठरलं आहे तिथे नक्की वापरावं

7. Myco Jangi (Myco Seeds)

  • जमीन प्रकार: हलकी, थोडी मुरमाट टाईप जमीन
  • बोंड: साडे 3 ते 4 ग्रॅम; संख्या जास्त, वजन थोडं कमी
  • उत्पन्न: 8 ते 10 क्विंटल प्रति एकर
  • विशेषता:
    • हलक्या जमिनीसाठी खास शिफारस
    • पाणी कमी लागणारी जात
    • मिडीयम क्वालिटीचा कापूस, पण सामान्य बजेटमधल्या शेतकऱ्यांसाठी योग्य

8. Dhanadev Plus (Myco Seeds)

  • जमीन प्रकार: मध्यम काळी, अर्ध हलकी आणि अर्ध बागायती
  • बोंड: मध्यम टपोऱं; सरासरी वजन 5 ग्रॅमच्या आसपास
  • उत्पन्न: 9 ते 12 क्विंटल प्रति एकर
  • विशेषता:
    • मायकोच्या सर्वाधिक मागणी असलेल्या वाणांपैकी एक
    • बाजारात दर वर्षी सातत्याने उपलब्ध
    • अर्ध बागायती ठिकाणी उत्तम उत्पादन
    • शिफारस: कमी खत व पाण्यावर उत्पादन हवे असेल, तर चांगला पर्याय

9. Ajit 155 (Ajit Seeds)

  • जमीन प्रकार: बहुतेक सर्व प्रकारच्या जमिनी
  • बोंड: मध्यम, सशक्त आणि समसमान
  • उत्पन्न: 10 ते 13 क्विंटल प्रति एकर
  • विशेषता:
    • शेतकऱ्यांचा या वाणावर जास्त विश्वास
    • सातत्यपूर्ण उत्पादन देणारी जात
    • शेतीचं नियोजन व्यवस्थित असेल, तर चांगला परतावा मिळतो

10. Asha (Nij Seeds)

  • जमीन प्रकार: काळी आणि अर्ध हलकी जमीन
  • बोंड: भरपूर संख्या; मिडीयम साईज
  • उत्पन्न: 9 ते 11 क्विंटल प्रति एकर
  • विशेषता:
    • एका झाडाला बोंडांची संख्या जास्त
    • जमिनीवर अवलंबून उत्पादन
    • अनेक भागांतील शेतकऱ्यांनी चांगला अनुभव शेअर केला आहे

cotton seed 2025 मध्ये नवीन आलेले वाण

  • Bio Seeds 6001
  • Myco Bouncer
  • Rasi Swift

cotton seed या नव्या वाणांविषयी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. काहींना उत्पन्न चांगले मिळाले, तर काही ठिकाणी वाण शेतकऱ्यांना उत्पन्न देण्यात कमी पडले आहे.

उत्पादनावर परिणाम करणारे घटक

cotton seed उत्पन्न फक्त वाणावर अवलंबून नसतं. खालील गोष्टींचाही मोठा प्रभाव असतो:

  • पाणी व्यवस्थापन (Drip किंवा पाटपाणी)
  • खताचे नियोजन
  • हवामानातील चढ-उतार
  • रोग व किडीचे नियंत्रण
  • वेळच्या वेळी केलेली फवारणी

निष्कर्ष

कापूस वाणांची (cotton seed) निवड करताना ‘फरतड’ टाळणं आणि बोंडाचे वजन लक्षात घेणं फार गरजेचं आहे. हलक्या जमिनीला कमी कालावधीची वाण, बागायतीसाठी टपोऱ्या बोंडाची वाण, आणि उत्पादनाच्या उद्दिष्टानुसार योग्य निवड केली तरच अपेक्षित यश मिळू शकतं. Rasi 659, 7067, Supercot यांसारख्या वाणांनी शेतकऱ्यांना मागील वर्षी चांगलं उत्पादन दिलं. तरीही तुमच्या जमिनीची अवस्था, सिंचन पद्धती आणि स्थानिक शेतकऱ्यांचा अनुभवातूनच योग्य बियाणे निवड करा.

cotton seed बियाणे कोणतेही निवडले तरी त्यातून उत्पन्न मिळवण्यासाठी आपल पीक नियोजन दिले जाणारे खते आणि औषधे अधिक महत्वाचे ठरते आहे. आपण जर कोणत्याही अधिक प्रभावी बियाण्याची निवड केली आणि आपल्याला निसर्गाने साथ दिली नाही तर आपल्याला त्या बियाण्यापासून देखील चांगले उत्पन्न मिळू शकत नाही. त्या मुळे लक्षात घ्या बियाणे निवड सोबतच; आपल्याला पीक नियोजन आणि निसर्गाची साथ चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी अधिक महत्वाचे आहे.

टीप: आम्ही कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाहीत. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीत आलेल्या अनुभवातून ही सर्व माहिती संकलित करण्यात आली आहे. म्हणूनच आपण आपल्या भागातील जमिनीचा प्रकार, हवामान आणि स्थानिक शेतकऱ्यांचा अनुभव विचारात घेऊनच योग्य cotton seed बियाण्याची निवड करावी, जेणेकरून उत्पादनात सातत्य आणि नफा मिळवता येईल. योग्य वाण, योग्य नियोजन आणि निसर्गाची साथ मिळाली तरच अधिक उत्पादन शक्य आहे.

Leave a Comment