apple iphone 17 pro max मित्रांनो, जेव्हा जेव्हा Apple चा नवा iPhone येतो, तेव्हा सगळ्या टेक जगात खळबळ उडते. आणि यावेळी तर खरी धमाल आहे!
iPhone 17 Series सप्टेंबरमध्ये येतेय आणि यात बऱ्याच नव्या गोष्टी बघायला मिळणार आहेत.
या वेळी फक्त एक नाही, तब्बल चार नवीन iPhone येणार आहेत –
iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि iPhone 17 Air.
iPhone 17 Air – हलका आणि थोडा स्वस्त
iPhone 17 Air ही सीरिजमधली सगळ्यात slim आणि हलकी डिव्हाईस असणार आहे.
ज्यांना फक्त कॉल, फोटो आणि सोशल मिडियासाठी फोन लागतो, त्यांच्यासाठी हा मस्त पर्याय आहे.
Apple ने याला “Ultra Slim” असं नाव दिलं आहे, आणि किंमतसुद्धा बाकी प्रो मॉडेल्सपेक्षा कमी असणार आहे.
Pro आणि Pro Max – apple iphone 17 pro max
Technical Guruji नावाच्या फेमस यूट्यूबरने याचे डमी मॉडेल्स रिव्ह्यू केले आहेत.
त्यांचं म्हणणं आहे की –
- iPhone 17 Pro मध्ये 6.3 इंचाचा स्क्रीन असणार आहे, जो खूपच क्लिअर आणि स्मूद असेल.
- Pro Max तर अजून भारी – 6.9 इंचाचा मोठा स्क्रीन आणि टॉप क्वालिटीचा डिस्प्ले!
कॅमेरा – फोटो लव्हर्ससाठी धमाका
Apple ने यावेळी कॅमेऱ्यावर जास्त लक्ष दिलंय.
दोन्ही प्रो फोनमध्ये तीन कॅमेरे असतील – आणि ती तिन्ही 48 MP चे!
- एक नार्मल फोटोसाठी,
- दुसरा झूम करायला,
- आणि तिसरा wide फोटोसाठी.
सेल्फीसाठी सुद्धा 24 MP चा चांगला कॅमेरा दिला जाईल असं म्हटलं जातंय.
फोनच्या बाजूला बटणं
फोनच्या एका साइडला
- कॅमेरा कंट्रोल आणि पॉवर बटण,
तर दुसऱ्या साइडला - व्हॉल्यूम बटण आणि Action बटण असणार आहे.
चार्जिंग पोर्ट – आता USB-C
Apple ने यावेळी USB-C पोर्ट दिलाय. म्हणजे चार्जिंग फास्ट, आणि डेटा ट्रान्सफर पण झपाट्याने!
बॅटरीही जरा जास्त काळ टिकेल असं म्हटलं जातंय – म्हणजे दिवसभरचा खेळ एकदम आरामात.
डिझाईनमध्ये एक वेगळेपण
यावेळी Pro आणि Pro Max च्या कॅमेऱ्याचं सेटींग थोडं वर सरकलंय – म्हणजे फोनच्या अगदी टॉपला.
जर तुम्ही नवीन iPhone घेण्याच्या विचारात असाल, तर अजून काही दिवस थांबा –
iPhone 17 Series येतेय धमाकेदार फिचर्ससह!
Air मॉडेल हलकं आणि परवडणारं, आणि Pro Max तर एकदम तगडा.
iPhone 17 Series भारतात किमत किती असणार
iPhone 17 Air या नवीन मॉडेलची भारतात सुरुवातीची किंमत ₹79,900 ठेवण्यात आली आहे. Apple च्या इतर प्रीमियम फोनच्या तुलनेत ही किंमत थोडी कमी असून, हा फोन अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेल्याचं दिसतं. हलकं वजन, स्लीम डिझाईन आणि आधुनिक फीचर्स असलेला iPhone 17 Air हा मॉडेल त्याच्या किंमतीच्या तुलनेत खूप काही देणारा ठरेल, असं तज्ज्ञांचं मत आहे. जे वापरकर्ते Apple चा फोन घ्यायचा विचार करत होते पण किंमतीमुळे थांबले होते, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी ठरू शकते.