AI smart farming जगातील प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर वाढत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये वेळेची बचत करण्यासाठी आणि कामाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी Ai चा वापर केला जातो. आजच्या धावत्या युगाला एआयकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला हवे असणारे काम तुम्ही अगदी काही मिनिटात ai च्या माध्यमातून करू शकता. सर्वच क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स फायद्याचे ठरत आहे. मग यातच जगातील प्रमुख असणारा व्यवसाय हा शेती हा व्यवसाय तरी किंवा हे क्षेत्र मागे कसे राहणार?
शेती तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धीचा वापर करून विविध यंत्रसामग्री बनवली जात आहे. मानवाप्रमाणेच कारणीभूत होणारी ही बुद्धिमत्ता संगणकीय प्रणाली द्वारे तयार केली जाते. या संगणकीय बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मानवी बुद्धीप्रमाणेच याकडून कार्य करण्याची क्षमता देखील उपलब्ध होते.

नेहमी हवामानात होणाऱ्या बदलाला प्रतिउत्तर देण्यासाठी एआय तंत्रज्ञान अतिशय फायदेशीर ठरत आहे. ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या पिकाला होणाऱ्या हवामान बदलाचा परिणाम नियंत्रणात आणण्यास मदत होते. हवामानाच्या होणाऱ्या बदलांमध्ये ai कडून योग्य नियोजन आणि कार्यप्रणाली शेती पिकाला मिळाल्यामुळे शेतीचे उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
AI म्हणजे नेमक काय असते
मागील काही वर्षापासून ai हा अतिशय चर्चेचा विषय बनलेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ai चा अधिक वापर होत आहे. मग बऱ्याच वेळा आपल्याला असा देखील प्रश्न पडतो की ए आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे असं तंत्रज्ञान आहे जे मानवी बुद्धीप्रमाणे काम करते.
आपण त्या तंत्रज्ञानाला ज्याप्रमाणे सूचना देऊ त्या सूचनेप्रमाणे ते तंत्रज्ञान अगदी मानवाने जसे कार्य करावे त्या प्रमाणात काम पूर्ण करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता यामध्ये असते. मानवी बुद्धीप्रमाणे निर्णय घेऊन योग्य कार्यक्षम व स्वयंचलित प्रणाली या आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून पूर्ण केली जाते.
थोडक्यात पाहायचं म्हटलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक मशीन असून ते मशीन पूर्णतः मानवी कार्य प्रणालीनुसार काम करते. ज्याप्रमाणे आपण एखाद्या कर्मचाऱ्याला सूचना देऊन त्याकडून काम करून घेतो. त्याचप्रमाणे आपण या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टमला कामाच्या सूचना देऊन त्याकडून अगदी काही मिनिटात हे काम करून घेऊ शकतो.
शेतीसाठी यायचा उपयोग कसा होतो
ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसाठी उपयोग अनेक तरुण शेतकरी करत आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामान अंदाज, कीडरोग नियंत्रण, मातीचे आरोग्य निरीक्षण, पिकांना आवश्यक असणारे खत व्यवस्थापन, पीक काढण्याची योग्य वेळ, उत्पादनाचे वर्गीकरण आणि साठवणूक या व अशा सर्व प्रक्रियेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेतकऱ्यांना मदत करते.
Ai शेतीला काय फायदा होतो AI smart farming
मागील काही दिवसापासून ai च्या मदतीने अनेक पिकांचे नियोजन केले आहे. या ai तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीला व शेतकऱ्यांना विविध फायदे झाल्याचे पाहायला मिळते. यामध्ये प्रामुख्याने ड्रोन, स्मार्ट सेंसर, स्वयंचलित फवारणी यंत्रे या उपकरणाच्या माध्यमातून शेतीचा खर्च कमी करून शेती कामासाठी लागणारा वेळ आणि कष्ट हे दोन्ही देखील कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले जात आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नासोबतच शेतकऱ्यांच्या पिकाची गुणवत्ता आणि सरासरी उत्पन्न देखील यायच्या मदतीने वाढते.
शेतीत वापर कसा होतो
AI smart farming तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसाठी येणाऱ्या विविध अडचणींचा पर्याय उपलब्ध होतो. ज्यामध्ये उत्पादन खर्च कमी केला जातो. पीक उत्पादन क्षमतेमध्ये मजूर टंचाई, कीड रोग नियंत्रण, पिक योग्य साठवणूक, बाजारभाव यासारख्या अनेक गोष्टी शेतकऱ्यांना सोयीच्या होतात.
सध्या अनेक पिकावर ai तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अनेक पिकावर प्रायोगिक तत्त्वावर हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. ऊस,फळबाग, पालेभाज्या, भाजीपाला अशा महत्त्वाच्या पिकाबाबत आर्टिफिशियल इंटेलिजन्स कार्य अत्यंत प्रभावी ठरत आहे. भविष्यात या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI smart farming) च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून नफा वाढवला जात आहे. या तंत्रज्ञानाचा भविष्यात अनेक शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होताना देखील दिसून येणार आहे.