AHMAHABMS Sheli gat पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन दरवर्षी ‘नाविन्यपूर्ण योजना’ अंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी अनेक पशुधन आधारित योजना राबवतो. यावर्षी देखील या योजनेअंतर्गत शेळी-मेंढी, गाय म्हैस वाटप योजना सुरू झाली असून, 3 मे 2025 पासून ते 2 जून 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, विशेषतः भूमिहीन व अत्यल्प भूधारकांना स्वावलंबी बनवणे हा आहे.

नाविन्यपूर्ण योजना कोणते प्राणी आणि किती अनुदान?
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे पशुधन पुरवले जाते:
- 10 शेळ्या + 1 बोकड
- 10 मेंढ्या + 1 नर मेंढा
- 2 म्हशी किंवा 2 गायी
या योजनेसाठी शासन सर्वसाधारण घटकाला 50 % अनुदान व अनुसूचित जाती जमाती यांना 75% अनुदान देणार असून उर्वरित रक्कम स्वहिस्सा किंवा बँक कर्जाच्या माध्यमातून भरणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची तारीख
- फॉर्म भरण्याची तारीख: 3 मे 2025
- शेवटची तारीख: 2 जून 2025
- Online अर्ज केवळ https://ah.mahabms.com या पोर्टलवरूनच करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया
1. पोर्टलवर जा
Google वर “AH MahaBMS” असे टाईप करा.
पहिलीच लिंक उघडून, पशुसंवर्धन विभागाची अधिकृत वेबसाइट उघडा.
2. अर्जदार नोंदणी
“अर्जदार नोंदणी” या ऑप्शनवर क्लिक करून, खालील माहिती भरावी लागेल:
- आधार क्रमांक
- नाव, वडिलांचे/पत्निचे नाव, आडनाव
- लिंग, मोबाईल नंबर
- जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत
- जात प्रवर्ग व प्रमाणपत्र
- दिव्यांग असल्यास त्याची माहिती
- शिक्षण पात्रता
- जमीन (हैक्टरमध्ये)
- बँक खाते तपशील – IFSC कोडसह
- अर्जदाराचा फोटो आणि सही अपलोड करणे
3. कौटुंबिक माहिती भरा
राशन कार्डवरील इतर सदस्यांची नावे, आधार क्रमांक, लिंग यांची माहिती भरावी लागते.
नाविन्यपूर्ण योजना योजना निवड व पात्रतेच्या अटी
“राज्यस्तरीय शेळी-मेंढी वाटप योजना” किंवा इतर जिल्हास्तरीय योजना निवडता येतील. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे भरावीत:
- महिला बचत गटाची सदस्य आहात का?
- भूमिहीन आहात का?
- 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे का?
- दारिद्र्य रेषेखालील यादीत आहात का?
- सुशिक्षित बेरोजगार आहात का?
- स्वयरोजगार केंद्रात नोंद आहे का?
- चारा पिकासाठी सिंचन आहे का?
- सध्या कोणते पशुधन आहे?
- शेळी-मेंढी पालनासाठी वाडा आहे का?
- प्रशिक्षण घेतले आहे का?
- स्वहिस्सा स्वतःचा की बँकेचा?
- मागील योजनांचा लाभ घेतला आहे का?
- सरकारी सेवेत कोणी आहे का?
अर्ज करताना लक्षात ठेवाव्यात ‘या’ गोष्टी
- फॉर्म एकदाच भरता येतो, सेव केल्यावर बदल करता येत नाही.
- सर्व माहिती खरी आणि अचूक असावी, अन्यथा फॉर्म रद्द होऊ शकतो.
- अर्ज पूर्ण केल्यानंतर ‘जतन करा’ या बटणावर क्लिक करा.
- ‘अर्ज क्रमांक’ आणि प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे.
लॉटरी आणि अंतिम निवड
या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड ही संगणकीय लॉटरीच्या आधारे होणार आहे. लॉटरी लागल्यास:
- आपल्याला आवश्यक डॉक्युमेंट्स सादर करावे लागतील.
- अनुदानाची रक्कम थेट खात्यावर जमा होईल.
त्यामुळे अर्जाची प्रिंट साठवून ठेवा, आणि लॉटरी निकाल प्रकाशित झाल्यावर नियमितपणे वेबसाईट तपासा.
AHMAHABMS Sheli gat आवश्यक कागदपत्रं
- आधार कार्ड
- जातीचा दाखला (SC/ST असल्यास)
- 7/12 उतारा किंवा जमीन नसल्याचा दाखला
- राशन कार्ड
- बँक पासबुकची झेरॉक्स
- शिक्षण प्रमाणपत्र
- बचत गटाचे प्रमाणपत्र (असल्यास)
- प्रशिक्षण प्रमाणपत्र (असल्यास)
- पासपोर्ट साइज फोटो
- स्वहस्ताक्षर सही
योजना कोणासाठी उपयुक्त?
ही योजना विशेषतः नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या ग्रामीण युवकांसाठी, महिला बचत गटांसाठी, आणि पशुपालनात रस असणाऱ्यांसाठी आहे.
भूमिहीन
अत्यल्प भूधारक
सुशिक्षित बेरोजगार
पशुधनसंपन्न शेतकरी
महिलांसाठी स्वतंत्र संधी
निष्कर्ष
पशुसंवर्धन खात्याची ही नाविन्यपूर्ण योजना म्हणजे स्वरोजगारासाठी सुवर्णसंधी आहे. थोडा प्रयत्न, योग्य माहिती आणि वेळेत अर्ज केल्यास, आपण आपला स्वतःचा शेळी-मेंढी गट तयार करू शकता आणि दैनंदिन उत्पन्नाचे स्थिर साधन उभं करू शकता.