11th admission मित्रांनो, दहावीचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर झाला आहे. 10 वी मध्ये एकूण 94 टक्के विद्यार्थी हे पास झाले आहेत. यंदा 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल झाला आहे. यापुढे कोणालाही कॉलेज मध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने अॅडमिशन घेता येणार नाही. प्रवेश प्रक्रिया फक्त ऑनलाईनच होणार आहे.

विशेष म्हणजे, 11th admission ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 19 मे 2025 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत तयार राहणं गरजेचं आहे.
नोंदणीसाठी तुम्हाला https://mahafyjcadmissions.in या शासकीय वेबसाईटवर जावं लागेल. ज्यांच्याकडे इंटरनेट किंवा संगणकाची सुविधा नाही, त्यांनी जवळच्या कॉम्प्युटर क्लास किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन नोंदणी करू शकता.
11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11th admission
1. वेबसाईटला भेट द्या
- https://mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
- तुमचं रहिवासी ठिकाण (तालुका/शहर) निवडा.
2. नवीन रजिस्ट्रेशन करा
- “New Registration” वर क्लिक करा.
- नाव, मोबाईल नंबर, ईमेल, 10वीचा सीट नंबर, वर्ष आणि बोर्ड ही माहिती भरा.
- काही प्रश्न विचारले जातील, त्यांची उत्तरं द्या.
- एक पासवर्ड तयार करून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
3. लॉगिन आयडी तयार होईल
- अर्ज सबमिट झाल्यावर तुम्हाला Login ID आणि Application Number मिळेल – ते जपून ठेवा.
4. फॉर्म 1 भरा
- लॉगिन करून डॅशबोर्डवर Form 1 भरा.
- पत्ता, पालकांचे नाव, मोबाईल नंबर, व्यवसाय आणि श्रेणी (SC/ST/OBC/EWS/OPEN) ही माहिती भरा.
5. कागदपत्र अपलोड करा
- 10वीची मार्कशीट, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ट्रान्सफर सर्टिफिकेट, फोटो.
6. फॉर्म 2 भरा
- फॉर्म 1 लॉक केल्यानंतर, लॉगिन करून Form 2 भरा.
- तुमच्या आवडत्या कॉलेजची यादी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
7. मेरिट लिस्टची वाट पहा
- एकूण 3 ते 4 मेरिट लिस्ट लागतील.
- पहिल्याच लिस्टमध्ये तुमचं पसंतीचं कॉलेज मिळालं, तर तिथे लगेच अॅडमिशन घ्यावं लागेल.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 19 मे 2025 पासून सुरू होत आहे. त्यामुळे वेळ न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रं तयार ठेवा आणि त्या दिवशी लगेच अर्ज करा.