पीएम किसान : केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) ही भारतातील लाखो लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी फार मोठा आधार आहे. या योजनेतून दरवर्षी शेतकऱ्यांना ₹6,000 ची थेट आर्थिक मदत मिळते. ही मदत तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजे दर चार महिन्यांनी ₹2,000 या स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

आतापर्यंत १९ हप्ते योजनेअंतर्गत वितरित करण्यात आले आहेत. आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे २० व्या हप्त्याकडे, जो जून 2025 च्या अखेरीस मिळण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा – हा पुढचा हप्ता मिळवायचा असेल, तर काही महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात!
पीएम किसान योजनेचा उद्देश काय आहे?
PM KISAN या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे आणि त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करणे हा आहे. बियाणे, खते, औषधे, शेतीची साधने यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी ही रक्कम खूप उपयोगी ठरते.
२० वा हप्ता कधी येणार?
सरकारी सुत्रांनुसार, २० वा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी काही पूर्वअट पूर्ण करणे आवश्यक आहे.
कोणते कामे वेळेत केली पाहिजेत?
तुम्हाला पीएम किसानचा पुढचा हप्ता हवा असेल, तर खालील 3 कामं तातडीने पूर्ण करा:
ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करा
ई-केवायसी ही सर्वात महत्त्वाची अट आहे. जर तुमचे e-KYC झाले नसेल, तर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही. जर आपण या आधी केवायसी केलेली असेल तर परत नव्याने आपल्याला केवायसी करण्याची आवश्यकता नाही. परंतु आपण अद्याप पर्यन्त पीएम किसान योजनेची केवायसी केली नसेल तर तात्काळ केवायसी करा.
ई-केवायसी करण्याचे 3 मार्ग:
- https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन स्वतः ऑनलाईन ई-केवायसी करा.
- PM-Kisan मोबाईल अॅप डाऊनलोड करून फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी करा.
- जवळच्या CSC (Common Service Centre) किंवा SSK सेंटर ला भेट द्या आणि तिथे तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या.
जर हे काम अजून बाकी असेल, तर ते लगेचच पूर्ण करा, अन्यथा योजनेपासून तुम्ही वंचित राहू शकता.
शेतकरी ओळखपत्र असणे अनिवार्य
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. शासनाने आता हे बंधनकारक केलं आहे.
शेतकरी ओळखपत्रामध्ये तुमची जमीन, सातबारा उतारा, आणि जमीन मालकीची माहिती असावी लागते. हे कागदपत्र तयार नसतील, तर आजच आपल्या जवळील csc केंद्राला भेट द्या. किंवा आपण स्वतः देखील या http://mhfr.agristack.gov.in/ संकेतस्थळाच्या माध्यमातून आपले शेतकरी ओळखपत्र काढू शकता.
बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करा
ई-केवायसी झाले तरी पुरेसे नाही, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं देखील तितकंच आवश्यक आहे.
आधार लिंक प्रक्रिया:
- ज्या बँकेत तुमचं पीएम किसानचं खाते आहे, तिथे थेट भेट द्या.
- आधार कार्डाची छायाप्रत व मूळ प्रत घेऊन जा.
- बँकेचा अधिकारी UID नंबरची पडताळणी करेल.
- लिंकिंग पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या मोबाइलवर SMS येईल.
जर आधार लिंक नसेल, तर तुमचं नाव लाभार्थी यादीतून काढून टाकलं जाऊ शकतं. त्यामुळे याची खात्री करून घ्या.
हे फायदे मिळत राहण्यासाठी काय काळजी घ्यावी?
- पीएम किसान योजनेचे पैसे थेट बँक खात्यात येतात, त्यामुळे खाते सक्रिय असावं, त्यात किमान शिल्लक असावी.
- मोबाईल नंबर बँक खात्यात आणि PM Kisan पोर्टलवर अपडेट असावा, कारण अपडेटस त्यावरच येतात.
- शेतजमीन तुमच्या नावावर असावी, भाडेकरू असाल तर लाभ मिळणार नाही.
माझे पैसे आले का हे कसं तपासावं?
तुमचा हप्ता आला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही PM-Kisan योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन खालील स्टेप्स फॉलो करा:
- https://pmkisan.gov.in ला भेट द्या
- ‘Farmers Corner’ वर क्लिक करा
- ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा
- तुमचा मोबाईल नंबर किंवा अर्ज क्रमांक टाका
- तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले की नाही याची माहिती दिसेल
तुमचं नाव यादीत आहे का?
‘Beneficiary List’ म्हणजे लाभार्थी यादीही वेबसाइटवर उपलब्ध आहे. तुमचं नाव त्यात आहे की नाही तेही तपासता येतं.
शेवटी एक महत्त्वाचा सल्ला
शेतकरी मित्रांनो, सुरक्षितपणे हप्ता मिळवण्यासाठी या तिन्ही कामांना प्राधान्य द्या:
- ई-केवायसी पूर्ण करा
- आधार लिंक करून घ्या
- शेतकरी ओळखपत्र तयार ठेवा
हे सगळं तुम्ही वेळेत केलं, तर २० वा हप्ता निश्चितच तुमच्या खात्यात जमा होईल. पीएम किसान योजना हे केंद्र सरकारचं अत्यंत उपयुक्त पाऊल आहे. योजनेचा लाभ वेळेवर मिळावा यासाठी नियम पाळणं अत्यावश्यक आहे.