पीएम किसान योजना 20 वा हफ्ता लवकरच.. तारीख ?

पीएम किसान योजना शेती करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हफ्ता लवकरच, म्हणजेच जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात, जे तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यावर DBT पद्धतीने (Direct Benefit Transfer) जमा होतात.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हफ्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ₹6000 रुपये दिले जातात, जे तीन हप्त्यांमध्ये थेट खात्यात पाठवले जातात. आतापर्यंत 19 हफ्ते मिळाले असून, योजनेत 50 हजार नवीन शेतकरी सामील झाल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढून जवळपास 93 लाखांवर पोहोचली आहे. हफ्ता बंद झाल्यास किंवा मिळालेला नसेल तर शेतकऱ्यांनी पोर्टलवर जाऊन आपलं स्टेटस तपासावं.

पीएम किसान योजना यापूर्वी 19 हफ्ते मिळाले

आतापर्यंत 19 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे 20 व्या हप्त्याकडे.
शेतकरी वर्गात विचारणा सुरू आहे – “आता पुढचा हफ्ता कधी येणार?”
सरकारी सुत्रांनुसार, पुढील महिना म्हणजेच जून 2025 मध्ये हा हफ्ता जमा होईल.

नोंदणी केलेल्या नवीन लाभार्थ्यांची भर

या योजनेमध्ये अनेक नागरिकांनी स्वतः ऑनलाईन अर्ज केले आहेत. यामुळे यावर्षी अंदाजे 50 हजार नवीन शेतकरी लाभार्थी या योजनेत सामील झाले आहेत.
म्हणूनच पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढून 93 लाखांजवळ पोहोचली आहे.

या योजनेप्रमाणेच महाराष्ट्र शासनाच्याही “नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत” शेतकऱ्यांना वार्षिक ₹6000 रुपये मिळतात.

पात्रतेसाठी आवश्यक गोष्टी

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील गोष्टी पूर्ण केलेल्या असाव्यात:

  • भू अभिलेख (जमिनीचे कागद) अद्ययावत असणे
  • बँक खातं आधार कार्डाशी संलग्न असणे (eKYC पूर्ण असणे)
  • पोर्टलवर स्वतः नोंदणी केली असणे

तुमचा हफ्ता का बंद झाला? स्टेटस ऑनलाइन तपासा

पीएम किसान योजना काही शेतकऱ्यांच्या बाबतीत असेही दिसून आले आहे की, पहिले काही हफ्ते मिळाले, नंतर बंद झाले.
अशा शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपलं स्टेटस तपासावं.

पीएम किसान योजना स्टेटस तपासण्याची पद्धत:

  1. https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
  2. मेनूतील “Beneficiary List” या पर्यायावर क्लिक करा.
  3. त्यानंतर तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
  4. शेवटी “Get Report” या बटनावर क्लिक करा.

तुम्हाला किती हप्ते मिळाले

  • pm kisan च्या अधिकृत संकतस्थळावर जा.
  • त्या ठिकाणी know your status हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्या नंतर आपला नोंदणी क्रमांक भरा. (उपलब्ध नसल्यास वर दिलेल्या know your ragistation no वर क्लिक करा.)
  • तुमचा नोंदणी क्रमांक भरा
  • समोर आलेला कॅप्चर कोड भरा.
  • कॅप्चर कोड भरल्यावर गेट ओटिपी या पर्यायावर क्लिक करा.

या पद्धतीने तुम्हाला किती हप्ते मिळाले, सध्या हफ्ता सुरू आहे का बंद, याबाबतची सर्व माहिती मिळेल.

अर्ज करायचा आहे का?

जर तुम्ही अजूनही या योजनेत नोंदणी केलेली नसेल, किंवा पात्र असूनही हफ्ता मिळत नसेल, तर तुम्ही स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकता.
यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक डिटेल्स, जमीन कागदपत्रं आणि मोबाईल नंबर लागेल.

पीएम किसान योजना निष्कर्ष

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हफ्ता जून 2025 मध्ये येणार आहे, ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी आहे.
ज्यांनी अद्याप eKYC पूर्ण केली नाही, किंवा स्टेटस तपासले नाही – त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी.
किती हफ्ते मिळाले, स्टेटस काय आहे, अर्ज कसा करायचा – सगळी माहिती आता ऑनलाईन सहज उपलब्ध आहे.

Leave a Comment