शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पाईपलाईन अनुदान योजना

पाईपलाईन अनुदान योजना : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू आहे, ती म्हणजे पाईपलाईन अनुदान योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या पाईपलाईनसाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. विशेष बाब म्हणजे पीव्हीसी (PVC) आणि एचडीपीई (HDPE) या दोन्ही प्रकारच्या पाईपसाठी हे अनुदान उपलब्ध आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पाईप निवडण्याची संधी मिळते.

या योजनेत सामाजिक प्रवर्गांनुसार आणि शेतकऱ्यांनी निवडलेल्या पाईपच्या प्रकारानुसार अनुदानाची रक्कम ठरवली जाते. सर्वसाधारण आणि इतर obc शेतकऱ्यांसाठी पीव्हीसी पाईपसाठी प्रति मीटर ३५ रुपये अनुदान मिळते. तर एचडीपीई पाईपसाठी हे अनुदान प्रति मीटर ५० रुपये आहे. या गटातील शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त १५,००० रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. याचा अर्थ, या गटातील शेतकरी साधारणपणे ४२८ मीटर लांबीच्या पाईपसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी या योजनेत विशेष तरतूद करण्यात आली आहे. या प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाईपलाईनसाठी १००% अनुदान दिले जाते. म्हणजेच त्यांना पाईप खरेदीसाठी कोणताही खर्च करावा लागत नाही. या शेतकऱ्यांसाठी अनुदानाची कमाल मर्यादा ३०,००० रुपये प्रति लाभार्थी इतकी निश्चित करण्यात आली आहे.

महाडीबीटी पोर्टलवरून करा ऑनलाईन अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी (MahadBT) या सरकारी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. महाडीबीटी पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती आणि अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देते. त्यामुळे, इच्छुक शेतकरी घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायद्याची आहे. पाण्याअभावी होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाईपलाईनची गरज आहे, त्यांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलला भेट द्या.

पाईपलाईन अनुदान योजना

या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल, यात शंका नाही. पाण्याची सोय झाल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगले उत्पादन घेता येईल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

Leave a Comment